Monday, November 25, 2024
Homeनंदुरबारट्रायबल हेल्थ ऍक्शन प्लॅन अंतर्गत नंदुरबार जिल्हयात २ ग्रामीण रुग्णालये, ५ आरोग्य...

ट्रायबल हेल्थ ऍक्शन प्लॅन अंतर्गत नंदुरबार जिल्हयात २ ग्रामीण रुग्णालये, ५ आरोग्य केंद्रे आणि ५० उपकेंद्रांना मान्यता

नंदुरबार | दि.१२| प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या ट्रायबल हेल्थ ऍक्शन प्लॅन अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात २ ग्रामीण रूग्णालये, ५ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ५० उपकेंद्रे स्थापन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

- Advertisement -


नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश भाग हा आदिवासी व डोंगराळ आहे. त्या परिसरातील जनतेला तत्परतेने आरोग्य सेवा पुरविण्याकरीता तसेच माता मृत्यू, बाल मृत्यू व कुपोषण अशा आरोग्यविषयक समस्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्रशासनाच्या ट्रायबल हेल्थ ऍक्शन प्लॅन अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात २ ग्रामीण रूग्णालये, ५ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ५० उपकेंद्रे स्थापन करण्यास विशेष बाब म्हणुन या शासनाने मान्यता दिली आहे.

यात धडगाव तालुक्यातील काकडदा व बिलगाव येथे ग्रामीण रुग्णालयांना मान्यता देण्यात आली आहे.
धडगाव तालुक्यातील गोरांबा, असली, नावली, श्रावणी, कन्साई या पाच ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.

तर शहादा तालुक्यातील लक्कडकोट, साबलापाणी, कोटबांधणी, म्हसावद-२, चिखली बु., प्रभुदत्तनगर, अनरद-१, वाडी पुनर्वसन, काथर्देदिगर पुनर्वसन, प्रकाशा-२, नवागांव, पिपराणी, मालगांव, खेडदिगर, सारंगखेडा-२, आडगांव,

तळोदा तालुक्यातील बोरद-२, सिलींगपूर, रापापूर, भंवर, आमलपाडा, बंधारा, कोठार

अक्कलकुवा तालुक्यातील मोजापाडा, कंकाळमाळ, मक्राणीफळी, घटांणी, हवालदारफळी, केशवनगर,

धडगाव तालुक्यातील वावी, मांडवी खुर्द, कात्री-२ (कामोदपाडा), कात्री-३ (शेलखीपाडा), खांडवारा, खरडा, खमला, सिंदीदिगर, लेगापाणी,

नवापूर तालुक्यातील बिजादेवी, पिंपळे मालवण, वडसत्र, केलपाडा, तारपाडा, पागंरण, चिखली, नवापाडा, बोरचक, नगारे, थुवा या उपकेंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.


प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी व उपकेंद्रांसाठी विहित पध्दतीने जागा अधिग्रहीत करुन सदर जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांचे बांधकाम जिल्हा नियोजन निधीतून झाल्यावर पदनिर्मिती करण्याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार आहे.

तसेच ग्रामीण रुग्णालयांसाठी विहित पध्दतीने जागा अधिग्रहीत करुन सदर जागेवर बांधकाम व पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने काल दि. ११ जुलै रोजी जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना मान्यता दिली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या