Sunday, September 8, 2024
Homeक्राईमडांबून ठेवलेल्या व्यक्तीस सोडविण्यास गेलेल्या पोलिसांवर हल्ला

डांबून ठेवलेल्या व्यक्तीस सोडविण्यास गेलेल्या पोलिसांवर हल्ला

40 ते 45 जणांवर गुन्हा, या गावातील घटना

धुळे । (प्रतिनिधी) : डांबून ठेवलेल्या व्यक्तीस सोडविण्यास गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. मारहाण करीत दगडफेक केली. तसेच शासकीय वाहनाचे नुकसान केले. साक्री तालुक्यातील कळंबीर गावात ही घटना घडली. याप्रकरणी 40 ते 45 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि.18 जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास डायल 112 वर एकाने फोन करून कळंबिर गावात दोन समाजातील मागील भांडणाच्या कारणावरून वाद होवून एका समाजाच्या व्यक्तीस डांबुन ठेवले असल्याचे कळविले. त्यानंतर साक्री पोलिस ठाण्याचे पोकाँ रोशन चित्ते यांच्यासह कर्मचारी कळंबिर गावात दाखल झाले. त्या व्यक्तीस सोडविण्यास गेल्याच्या कारणावरून रात्री आठ वाजेच्या सुमारास मारूती मंदिराच्या चौकात दीपक भिल, मनोज उर्फ मन्या सोनवणे,जितू मालचे, रविंद्र ठाकरे, राहुल छोटु भिल, अर्जुन भिमराव भिल, आकाश भिल,भर्‍या उर्फ भरत भिमराव ठाकरे, अजय भिल, योगेश उर्फ योग्या भिल, भर्‍या उर्फ भरत किसन वाघ , छगन काशिनाथ सोनवणे, बारकु सोनवणे, पवन सोनवणे, भरत तुळशिराम सोनवणे, मच्छिद्र सुरेश भिल, देवेंद्र बापु भिल, मोन्या उत्तराण्या मालचे, गिजराम देवा वाघ, राहल पिंटु पगारे, राजु लक्ष्मण सोनवणे, देवदत्त लक्ष्मण सोनवणे व इतर 20 ते 25 इसम सर्व (रा.कळंबिर ता.साक्री) यांनी जिवेठार मारण्याच्या उद्देशाने पोलिसांना हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच दगडफेक करीत जखमी केले. शासकीय कामात अडथळा निर्माण करून शासकीय वाहनाचे नुकसान केले. याबाबत पोकॉ रोशन चित्ते यांच्या फिर्यादीवरून वरील 40 ते 45 जणांवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109,132,115(2),189(2), 191(2),190,324 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील पोलिस उपनिरीक्षक संदीप संसारे करीत आहेत.

- Advertisement -

- Advertisment -

ताज्या बातम्या