वावी । वार्ताहर Vavi
तडीपारीची शिक्षा भोगून परत आलेल्या प्रवीण उर्फ भैय्या गोरक्षनाथ कांदळकर (27) याचा तालुक्यातील शहा येथील घरात शिरून गावातीलच 14 मुलांनी कोयता, कुर्हाड, लोखंडी रॉड, लाकडी दांड्याच्या सहाय्याने खून केल्याची घटना आज (दि.26) सकाळी 11 च्या दरम्यान घडली.
- Advertisement -
दरम्यान, घडलेल्या प्रकारानंतर प्रवीण उर्फ भैय्याला सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला तपासून मयत घोषित केले . या बाबतची तक्रार मयत प्रवीणच्या आई विजया कांदळकर (44) यांनी वावी पोलीस ठाण्यात दिली आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे व हवालदार शहाजी शिंदे करीत आहेत.