Friday, September 20, 2024
Homeधुळेतलवारी, चॉपर बाळगणे पडले महागात; दोघे जेरबंद

तलवारी, चॉपर बाळगणे पडले महागात; दोघे जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

धुळे | प्रतिनिधी- शहरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने तलवारी बाळगणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून ४ तलवारी व चॉपर जप्त करण्यात आले. दोघांविरोधात चाळीसगावरोड पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने समीर सलीम खाटीक (वय १९) व अयान अबर मनियार, (वय १९ रा. शंभर फुटीरोड, अलहेरा हायस्कुल जवळ, धुळे) यांना सुमैय्या हॉल जवळून ताब्यात घेतले. चौकशीत अयान मनियार याने त्याच्या घरातून ४ हजारांच्या चार तलवारी काढून दिल्या. तर समीर खाटीक याच्या अंगझडतीत एक पाचशे रूपये किंमतीचे ११ इंच लांब व ५ इंच रुंद चॉपर मिळुन आला. एकुण ४ हजार ५०० रूपये किंमतीच्या चार तलवारी व एक चॉपर जप्त करण्यात आला.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सपोनि श्रीकृष्ण पारधी, पोहेकॉ पंकज खैरमोडे, प्रशांत चौधरी, पोकॉ. हर्षल चौधरी, जगदीश सुर्यवंशी व मयुर पाटील यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या