Saturday, November 23, 2024
Homeधुळेदहिवेल बंदची हाक; मुकमोर्चाचे आयोजन

दहिवेल बंदची हाक; मुकमोर्चाचे आयोजन

सामाजिक कार्यकर्त्यांवरील हल्ला, गुन्हेगारीविरोधात ग्रामस्थांची एकजुट

पिंपळनेर | वार्ताहर – साक्री तालुक्यातील दहिवेल येथील सामाजिक कार्यकर्ते कन्हैयालाल माळी यांच्यावरील प्राणघातक हल्ला व गावात वाढत्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ दहिवेलकरांनी उद्या दि.१९ जुलै रोजी बंदची हाक दिली आहे. तसेच सकाळी १० वाजता झेंडा चौक ते पोलीस ठाण्यापर्यंत मूकमोर्चाचे आयोजन केले आहे. पुढे त्याचे रूपांतर रस्तारोकोमध्ये करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी मोर्चात सहभागी होण्यासह कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हल्लयाच्या निषेधार्त काल ग्रामस्थ, व्यापार्‍यांनी एकत्र येत बैठक झाली. त्यात घटनेचा निषेध व्यक्त करण्यासह मूक मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले.

बैठकीला साहेबराव बच्छाव, हिंमतराव बच्छाव, राजेंद्र पाटील, वसंतराव बच्छाव, रामदास माळी, बापु माळी, संदीप माळी, मनोज चौधरी, प्रविण चौधरी, गुलाब चौधरी, चंद्रकांत वाणी, सुधीर मराठे, सचिन दहिवेलकर आदींसह ग्रामस्थ, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दहीवेल येथील सामाजिक कार्यकर्ते कन्हैयालाल श्रावण माळी यांच्यावर दि.१० जुलै  रोजी रात्री आठ ते सव्वा आठ वाजेदरम्यान गावानजीक चार अज्ञात व्यक्तींनी दोन दुचाकी रस्त्याला आडव्या करून काही कारण नसताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांच्या दुचाकींचा क्रमांक अंधार असल्यामुळे व गंभीर दुखापत झाल्यामुळे माळी यांना ओळखता आला नाही. तसेच हल्लेखोरांनी चेहरे कपड्याने झाकले असल्यामुळे त्यांचे चेहरे देखील ओळखीचे लागले नाहीत.  काही वेळानंतर रस्त्यावरून जाणार्‍या कालदर येथील चौरे नामक व्यक्तीने जखमी झालेल्या कन्हैयालाल माळी यांना ओळखून त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधून तात्काळ त्यांना उपचारासाठी साक्री येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर कन्हैयालाल माळी यांनी साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली.

- Advertisement -

दरम्यान या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.  या घटेनचा समस्त ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी व परिसरातील लहान मोठ्या दुकानदारांनी काल बैठकीत निषेध नोंदविला. तसेच माळी यांच्यावरील हल्ला व गावात वाढत्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ उद्या दि. १९ रोजी गाव बंद ठेवण्यासह मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. दहिवेल आऊट पोस्टचे सर्व कर्मचारी बदलण्यात यावे, असा नाराजीचा सूर देखील ग्रामस्थांमध्ये दिसून आला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या