धुळे : विधानसभा निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी धुळे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघासाठी ८३ व्यक्तींनी १५८ नामनिर्देशन पत्र घेतल्याची माहिती निवडणुक शाखेमार्फत देण्यात आली आहे.
विधानसभा मतदार संघ निवडणूक-२०२४ ची अधिसूचना आज दि.२२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आज पहिल्या दिवशी ०५- साक्री विधानसभा मतदार संघासाठी १६ व्यक्तींनी ३४ अर्ज, ०६-धुळे ग्रामीण १४ व्यक्तींनी २२ अर्ज, ०७-धुळे शहर २९ व्यक्तींनी ५१ अर्ज, ०८-शिंदखेडा २० व्यक्तींनी ३७ अर्ज तर ०९-शिरपूर मतदार संघासाठी ४ व्यक्तींनी १४ अर्ज असे एकूण पाच विधानसभा मतदार संघासाठी ८३ व्यक्तींनी १५८ अर्ज खरेदी केले. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नसल्याचे निवडणूक शाखेने सांगितले.