Tuesday, March 25, 2025
Homeधुळेधुळे जिल्ह्यात वर्षभरात 370 प्राणांतिक अपघात

धुळे जिल्ह्यात वर्षभरात 370 प्राणांतिक अपघात

एसपी श्रीकांत धिवरेंकडून उपाययोजनांचा ॲक्शन प्लॅन तयार

धुळे । (राम निकुंभ)- जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल 370 प्राणांकित (फेटल) अपघात झाले आहेत. त्यात वाहनाची वाहनाला धडक अशा अपघातात 234 जणांना आपला जिव गमवावा लागला असुन 294 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच पादचार्‍यांना वाहनाने धडक मारल्याचे एकुण 120 अपघात झाले असून त्यात 84 जणांचा मृत्यु झाला. तर 59 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. धुळे शहरासह जिल्ह्यातील वाढते अपघात लक्षात घेत ते रोखण्यासाठी पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व फेटल आणि गंभीर अपघातांचे पोलिस विभागाने विश्लेषण केले आहे. त्यात अपघात ठिकाणे, वेळा, वाहने, कारणे, उपाययोजना, मयताचे वय, कोणती वाहने, अपघात प्रकारचा समावेश आहे. याबरोबरच गुगल मॅपवर प्रत्येक फेटल आणि गंभीर अपघाताचे मॅप काढले असून त्यानुसार या प्रत्येक घटनेमध्ये उपाययोजना काय करता येतील याचे चार्ट तयार केले आहेत. याबरोबरच या उपाययोजना कोणत्या विभागाशी (एनएचएआय, पीडब्लूडी, मनपा) संबंधित आहेत, त्यांना लेखी व मॅपसह कळविण्यात येणार आहे.

धुळे जिल्ह्यात दि.1 जानेवारी ते दि.27 डिसेंबर 2024 दरम्यान झालेल्या फेटल व गंभीर अपघातांचे पोलिसांनी सविस्तर विश्लेषण केले आहे. त्यानुसार धुळे शहरास लागुन असलेल्या राज्य महामार्गावर एकुण 129 अपघात झाले आहेत. त्यात 75 जणांचा मृत्यु झाला असून 110 जणांंना गंभीर दुखापत झाली आहे. धुळे शहरालगत असलेल्या लहान मोठ्या गावांना लागुन असलेल्या इतर रस्त्यावर एकुण 68 अपघात झाले आहेत. त्यात 51 जणांचा मृत्यु झाला असुन 44 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. धुळे जिल्हयात झालेल्या एकुण अपघातापैकी 70 टक्के अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर, 20 टक्के अपघात राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर व 10 टक्के अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर झालेले आहेत. जिल्हयात झालेल्या अपघातांची वेळ पाहता दुपारी 3 ते सायंकाळी 6 दरम्यान एकुण 125 अपघात झाले आहेत. त्यात 86 जणांचा मृत्यु झाला असुन 82 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच सायंकाळी 6 ते रात्री 9 दरम्यान एकुण 110 अपघात झाले असून त्यात 69 जणांचा मृत्यु झाला असुन 89 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. रात्री 9 ते 12 दरम्यान 102 अपघात झाले आहेत. त्यात 68 जणांचा मृत्यु तर 72 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. याबरोबरच रात्री 12 ते 3 वाजेदरम्यान एकुण 99 अपघात झालेले आहेत. त्यात 65 जणांचा मृत्यु झाला असुन 88 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. जिल्हयात झालेल्या अपघातातील वाहनांचे निरीक्षण केले असता ट्रक/लॉरींचे एकुण 116 अपघात झाले आहेत. त्यात 82 जणांचा मृत्यु झाला असुन 93 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. कार, जिप, व्हॅन व टॅक्सीचे एकुण 86 अपघात झाले आहेत. त्यात 50 जणांचा मृत्यु झाला असुन 73 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. तर मोटारसायकल वाहनाचे एकुण 91 अपघात झाले आहेत. त्यात 53 जणांचा मृत्यु झाला असुन 73 जण गंभीर जखमी झाले आहेत. जिल्हयात झालेल्या अपघातांच्या प्रकाराचे निरीक्षण केले असता वाहनाची वाहनाला धडक असे एकुण 365 अपघात झाले आहेत. त्यात 234 जणांचा मृत्यु झाला असुन 294 जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच पादचार्‍यांना वाहनाने धडक मारुन असे एकुण 120 अपघात झाले असून 84 जणांचा मृत्यु झाला असुन 59 जण गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

लहान मुले, युवांचे अधिक अपघात- धुळे जिल्हयात झालेल्या अपघातातील व्यक्तिच्या वयाचे निरीक्षण केले असता 18 वर्ष वयापेक्षा कमी असलेले एकुण 213, 25 ते 35 वयोगटातील असलेले 190, 18 ते 25 वयोगटातील असलेले 72 व 45 ते 60 वयोगटातील असलेले 71 जणांचे अपघात झाले आहेत.
142 अपघातात डोके आदळ्याने 95 जणांचा मृत्यू-जिल्हयात झालेल्या अपघातांच्या धडकेचे (टक्कर) निरीक्षण केले असता मागुन धडक दिल्याने 254 अपघात झाले आहेत. त्यात 185 जणांचा मृत्यु झाला असुन 147 जण गंभीर जखमी झाले आहे. तर डोक्याला धडक देवून डोके आदळून एकुण 142 अपघात झाले आहेत. त्यात 95 जणांचां मृत्यु झाला असुन 116 जण गंभीर दुखापत झाले आहे.


सर्वाधिक धुळे तालुकाहद्दीत अपघात- सन 2024 मध्ये धुळे जिल्हयातील धुळे तालुका पो.स्टे 67, शिरपुर तालुका 49, साक्री पो.स्टे 37, नरडाणा पो.स्टे 29, मोहाडी व शिरपुर शहर पो.स्टे 25, शिंदखेडा पो.स्टे 24, निजामपुर पो.स्टे 23, सोनगीर व दोंडाईचा पो.स्टे 18, पश्चिम देवपुर पो.स्टे 14, पिंपळनेर पो.स्टे 11, आझादनगर पो.स्टे 8, थाळनेर पो.स्टे 7, चाळीसगांव रोड पो.स्टे 6, देवपुर पो. स्टे 5 व धुळे शहर पोलीस ठाणे हद्दीत 01 असे एकुण 370 प्राणांकित (फेटल) अपघात झाले आहेत.

धुळे शहरासह जिल्ह्यात सन 2024 मध्ये झालेल्या अपघातांचे पोलिस विभागाने सूक्ष्म विश्लेषण केले आहे. याबरोबरच गुगल मॅपवर प्रत्येक फेटल आणि गंभीर अपघाताचे मॅप काढले आहेत. त्यानुसार उपाययोजनांचे चार्ट तयार केले असून याबाबत संबंधीत विभागांना लेखी व मॅपसह कळविण्यात येणार आहे.
-श्रीकांत धिवरे, जिल्हा पोलिस अधिक्षक, धुळे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...