Sunday, October 20, 2024
Homeक्राईमधुळे तालुक्यातील तिघा सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार

धुळे तालुक्यातील तिघा सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर कारवाई

धुळे | प्रतिनिधी- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तालुक्यातील तीन सराईत गुन्हेगारांना धुळे जिल्हयासह चार जिल्हयातून हद्दपार करण्यात आले आहे. धुळे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या सुचनेनुसार उपविभागीय दंडाधिकारी यांनी हे आदेश पारित केले. या कारवाईमुळे तिघांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण केलेल्या भिती व दहशतीचे वातावरण कमी होण्यास मदत होईल.

धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील विशाल दिलीप पाटील (रा.फागणे ता.धुळ), तुषार विठ्ठल बोडरे (रा.नेर ता.धुळे) व रोहन सखाराम थोरात (रा.अंबोडे ता.धुळे) यांच्या विरोधात भारतीय दंडसंहिता कलमान्वये वारंवार गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण केलेले होते. तिघांच्या या कृत्यांना आळा बसावा तसेच त्यांच्याविरुध्द दाखल गुन्हयांचा अभिलेख पाहता आगामी विधानसभा निवडणुक-२०२४ शांततेत व सुरळीत पारपाडावी या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तिघाविरूध्द पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक दीपक धनवटे, अनिल महाजन, पोहेकॉ नितीन चव्हाण, मनोज बाविस्कर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम वर्ष १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे हद्दपार प्रस्ताव तयार करून ते उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठविले होते.
त्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी यांनी विशाल पाटील व तुषार बोडरे या दोघांना धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक या जिल्हयातुन दोन वर्षासाठी तर रोहन थोरात यास धुळे जिल्हयातून सहा महिन्यांसाठी हद्दपार केले आहे.

- Advertisement -

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या