Wednesday, May 6, 2026
Homeधुळेधुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थ्यांचा रोड रन वॉकदरम्यान मृत्यू

धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थ्यांचा रोड रन वॉकदरम्यान मृत्यू

धुळे (प्रतिनिधी) : शहरातील पालेशा महाविद्यालयाजवळील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील निवृत्त सैनिक असलेल्या प्रशिक्षणार्थीचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी रोड रन वॉक दरम्यान त्रास सुरू झाल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले, अशी माहिती केंद्राचे प्राचार्य विजय पवार यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.पं

पंकज लक्ष्मणराव घावट (वय 42, रा. सावळापूर, ता. अचलपूर, जि. अहिल्यापूर) असे मयत प्रशिक्षणार्थ्यांचे नाव आहे. ते नागपूर विभागातुन पोलिस भरती झाले. दि.9 ऑक्टोबर 2024 पासून माजी सैनिक असलेले पंकज घावट यांनी धुळ्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण सुरू केले होते. आज सकाळी नेहमी प्रमाणे पावणे सहाच्या सुमारास सर्व प्रशिक्षणार्थी रोड रन वॉकसाठी गेले होते. रनिंगनंतर परत येताना लेनिन चौकाजवळ पंकज घावट यांना अचानक त्रास होवु लागला. त्यांनी सोबतच्या प्रशिक्षणार्थी प्रतीक, योगेश, राहुल यांना त्रासाबद्दल सांगितले. त्यानंतर त्यांनी त्यांना तातडीने रस्त्याच्या कडेला बसवले आणि पोलिस व्हॅनद्वारे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मात्र, तेव्हाच त्यांनी प्रशिक्षणार्थी घावट हे कोणतीही शारीरिक प्रतिसाद देत नसल्याचे सांगितले. काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट असून हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने हा झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु शवविच्छेदन अहवालानंतर कारण स्पष्ट होईल.

- Advertisement -

ताज्या बातम्या

राधा

पंढरपूरमध्ये नृत्यांगना राधा पाटीलच्या कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ, किरकोळ कारणावरुन हुल्लडबाजांचा तुफान...

0
सोलापूर | Solapurपंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात नृत्यांगना राधा पाटील हिच्या कार्यक्रमात मोठा राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गावात सुरू असलेल्या यात्रेनिमित्त आयोजित या...