Thursday, July 4, 2024
Homeधुळेधुळ्यात बेशिस्त वाहन पार्किंगला बसणार चाप

धुळ्यात बेशिस्त वाहन पार्किंगला बसणार चाप

शहर वाहतूक पोलिसांची वाहनांना जामर लावून कारवाई

धुळे | प्रतिनिधी
शहरातील बेशिस्त वाहन पार्कींगला आता चाप बसणार आहे. वाहतूक शाखेकडून जामरची खरेदी करण्यात आली असून आज पहिल्याच दिवशी गरुड कॉम्प्लेक्सजवळ वाहतूक शाखेने बेशिस्त पार्कींग केलेल्या वाहनांना जामर लावून दंडात्मक कारवाई केली.
शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून वाहनधारक रस्त्यावर कुठेही वाहन लावून वाहतूकीस अडथळा निर्माण करतात. अशा बेशिस्त पार्कींगमुळे अनेक वेळेस वाहतूक कोंडी होवून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा वाहनधारकांना शिस्त लागावी. तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी वाहतूक शाखेने जामर मागविले आहे. आज सकाळी साडेअकरा ते दुपारी दीड वाजेदरम्यान वाहतूक शाखेने गरुड कॉम्प्लेस व कराचीवाला खुंट येथे रस्त्यावर लावलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांना जॅमर लावण्यात आले. या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करीत त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रूपये दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई शहर वाहतूक सपोनि भूषण कोते, पोसई विनायक सैंदाणे, संदीप ठाकरे, एएसआय जितेंद्र आखाडे, विवेक वाघमोडे, मनोहर महाले, विलास मालचे, तौसिफ शेख, भूषण शेटे यांच्या पथकाने केली.
तर दंडात्मक कारवाई- वाहनधारकांनी वाहतूकीस अडथळा निर्माण होणार नाही, अशा प्रकारे व नो-पार्कीगमध्ये वाहने लावु नये. अन्यथा वाहनास जामर लावून दंडात्मक कारवाई केली जाईल, अशा इशारा सपोनि भूषण कोते यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या