Sunday, June 14, 2026
Homeनंदुरबारनंदुरबार जिल्हाधिकारीपदी डॉ.मिताली सेठी

नंदुरबार जिल्हाधिकारीपदी डॉ.मिताली सेठी

नंदुरबार | प्रतिनिधी-

येथील जिल्हाधिकारीपदी वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर येथील संचालक डॉ.मिताली सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

दि.९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधीकरणच्या महानगर आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांचा पदभार अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गेल्या १७ दिवसांपासून नंदुरबार जिल्हा जिल्हाधिकार्‍यांच्या प्रतिक्षेत होता.

दरम्यान, आज राज्य शासनाने राज्यातील आयएएस अधिकार्‍यांचे बदल्यांचे आदेश काढले. त्यात नंदुरबार जिल्हाधिकारीपदी नागपूर येथील वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) च्या संचालक डॉ.मिताली सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ.सेठी या २०१७ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या आतापर्यंत पाच पोस्टींग झाल्या आहेत. जुलै २०१८ ते एप्रिल २०१९ या काळात त्या अमरावती येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर जुलै २०१९ ते ऑक्टोबर २०१९ या काळात दिल्ली येथे केंद्र सरकारचे असिस्टंट सेक्रेटरी म्हणून काम पाहिले आहे.

त्यानंतर ऑक्टोबर २०१९ ते जुलै २०२१ या काळात त्या धारणी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, उपाविभागीय मॅजिस्ट्रेट, प्रकल्प अधिकारी या पदांवर कार्यरत होत्या. जुलै २०२१ ते नोव्हेंबर २०२२ या काळात चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे.

त्यानंतर जानेवारी २०२३ पासून त्या वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर येथील संचालकपदी कार्यरत होत्या.

तत्पुर्वी त्यांनी मे २००९ ते जून २०१२ या काळात तामिळनाडू येथील शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात सीनीयर रेसीडेंट म्हणून सेवा केली आहे. ऑगस्ट २०१२ ते फेब्रुवारी २०१५ या काळात त्या चेन्नई येथील एसआरएम डेंटल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत होत्या.

फेब्रुवारी २०१५ ते ऑगस्ट २०१७ या काळात पॉंडेचेरी इन्स्टीटयूट ऑफ मेडीकल सायन्सेस येथे असिस्टंट प्रोफेेसर म्हणून का र्यरत होत्या.

आज दि.२६ ऑगस्ट रोजी राज्य शासनाने आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यात डॉ.मिताली सेठी यांची नंदुरबार जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच ते आपल्या पदाचा कार्यभार स्विकारणार आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : महायुतीची ‘सेफ हाऊस’ पॉलिटिक्स; शिवसेनेनंतर भाजपचेही...

0
नाशिक | Nashik स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर महायुतीने (Mahayuti) आपल्या नगरसेवकांना एकत्र ठेवण्याची रणनीती आखली आहे. शिवसेनेचे (शिंदे...