Saturday, April 26, 2025
Homeधुळेधुळ्यात भिषण अपघात; बसवाहकासह तिघे ठार

धुळ्यात भिषण अपघात; बसवाहकासह तिघे ठार

धुळे (प्रतिनिधी)- शहरातील नगावबारीनजीक अजमेरा महाविद्यालयाजवळ आज रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. त्यात बस वाहकासह तीन जण जागीच ठार झाले. तर बस चालकासह पाच ते सहा प्रवासी जखमी झाले आहेत. सर्वांना तत्काळ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. अपघात इतका भयंकर होता की बसचा काच फुटून बस वाहक थेट बाहेर फेकला जावून बस खाली आला.

नरेंद्र अरुण पाटील (कमखेडा ता शिंदखेडा आगार )असे मयत वाहकाचे नाव आहे. चालक गंभीर जखमी असून 407 वाहनावरील पावरा व सूडके नामक दोन जण ठार झाले आहेत. एमएच 20 बी एल 2126 क्रमांकाची धुळे-शिंदखेडा ही बस शिंदखेडाच्या दिशेने जात होती. पावणे नऊ वाजेच्या सुमारास नगावबारीच्या पुढे अजमेरा महाविद्यालयाजवळ एमएच 18 एए 9925 क्रमांकाच्या बंद पडलेल्या 407 वाहनाला एमएच 19 एस 1249 क्रमांकाचे 407 वाहन टोचन लावून घेऊन जात होते. या 407 वाहनावर भरधाव बस धडकली. धडक इतकी भीषण होती की बसचा वाहक थेट काच फुटून बाहेर फेकला जाऊन बस खाली आल्याने ठार झाला. तर चालक गंभीर जखमी झाला आहे. काही प्रवासी देखील जखमी झाल्याची सांगितले जात आहे. तसेच 407 वाहनावरील दोन जण ठार झाले. अपघात झाल्यानंतर महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी व परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. तसेच अपघाताची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर बसखाली अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात आले. मयत व जखमींना तत्काळ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.

- Advertisement -

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...