Sunday, September 8, 2024
Homeमनोरंजन'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटातील अशोक सराफ यांच्या भुमिकेबाबत समोर आले नवे...

‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील अशोक सराफ यांच्या भुमिकेबाबत समोर आले नवे ट्विस्ट

नाशिक | Nashik

सचिन पिळगावकर यांनी २००४ साली दिग्दर्शित केलेल्या नवरा माझा नवसाचा चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. चित्रपटाची कथा, यातील सर्व कलाकार, संवाद, गाणी सगळेच अफलातून होते. आता या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी आधीच घोषणा केली होती. मात्र या चित्रपटात जेष्ठ अभिनेते अशोक सराफ हे या चित्रपटात कोणती भुमिका साकारणार याबाबत सस्पेन्स होता. पण नुकताच त्यांच्या भुमिकेबाबत खुलासा करण्यात आला आहे.

- Advertisement -

नवरा माझा नवसाचा पहिल्या चित्रपटातील सर्व कलाकारांनी आपली भूमिका चोख पार पाडली होती.तर एसटी बसमध्ये आत येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याने सर्व प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडले होते. या सगळ्यांमध्ये महत्वपूर्ण भुमिकेत झळकले होते ते म्हणजे लाडके अशोक सराफ म्हणजेच आशोक मामा. आता नवरा माझा नवसाचा २ मध्ये दिसणार आहेत.

चित्रपटाबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी सर्व प्रेक्षक आतुर झाले आहेत. या चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, हेमल इंगळे, स्वप्नील जोशी, हे मुख्य कलाकार आहेत. जेव्हा या चित्रपटाची घोषणा करण्यात आली तेव्हा या चित्रपटात अशोक सराफ का नाहीत? असा प्रश्न सर्वत्र उपस्थित करण्यात आला होता.

https://www.instagram.com/reel/C9l84sUtX_B/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

पण अशोक सराफ यांच्या सर्व चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे अशोक सराफ यांचा नवीन लूक समोर आला आहे. सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ यांनी एका चाहत्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे.अशोक सराफ यांनी नवरा माझा नवसाचा मधील कंडक्टरचा पोषक परिधान केला आहे. मात्र पुढे चालत आल्यावर त्यांचा पोषाख बदलतो.

विशेष म्हणजे या व्हिडिओत मामा रेल्वे स्टेशनवर दिसत आहेत. या लूकमध्ये निळा कोट, आकाशी शर्ट, आणि गळ्यात आयकार्ड अशोक सराफ यांनी परिधान केले आहे. अशोक सराफ यांनी या चित्रपटात तिकिट कलेक्टरची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण रेल्वे प्रवासात करण्यात आले आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख २० जूलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे नवरा माझा नवसाचा २ हा चित्रटप कसा असणार याबाबत प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झालेली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या