Monday, April 28, 2025
Homeनंदुरबारनवापूर येथे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या १७ गोवंशांची सुटका

नवापूर येथे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या १७ गोवंशांची सुटका

नवापूर | दि.१२| प्रतिनिधी

कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या १७ गोवंश जनावरांची नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने सुटका केली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.११ जुलै २०२४ रोजी गुप्त बातमीदारामार्फत वासरवेल ता.नवापूर येथे रघु गावीत याच्या घराच्या आडोशाला अवैधरित्या कत्तल करण्याच्या उद्देशाने क्रूरतेने निर्दयतेने गोवंश जनावरे बांधून ठेवल्याची माहिती पोलीसांना मिळाली.

त्यानुसार नवापूर पोलीस पथकाने वासरवेल गावात जावून कारवाई केली असता समुवेल रघु गावीत यांच्या घराचे आडोशाला जुबेर शेख बुरहान, रा.इस्लामपूरा, नवापूर मूळ रा.मालेगाव जि.नाशिक याने १७ गोवंश जनावरे क्रूरतेने व निर्दयतेने त्यांच्या तोंडाला व पायाला दोरीने जखडून बांधून कत्तलीच्या उद्देशाने चारा-पाण्या विना बांधून ठेवलेले मिळून आले.

या जनावरांना ताब्यात घेवून नवापूर येथील श्रीमती मंजुळादेवी अग्रवाल गोशाळेत सुरक्षितरित्या दाखल करण्यात आले आहे. याबाबत नवापूर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५,५. (ब) सह प्राण्याचा छल प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम चे कलम ११ अन्वये वर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यात ७५ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपअधीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरिक्षक विशाल सोनवणे, पोशि श्याम पेंढारे, पोशि दिनेश बाविस्कर, पोशि दिपक पाटील, चापोशि किशोर वळवी यांच्या पथकाने केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ एप्रिल २०२५ – ही सामूहिक जबाबदारी

0
तापमानाच्या वाढत्या पार्‍याबरोबर राज्याच्या धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. राज्यात सुमारे तीन हजार छोटे-मोठे जल प्रकल्प आहेत. सद्यस्थितीत त्या प्रकल्पांमध्ये सुमारे छत्तीस टक्के...