Wednesday, April 30, 2025
Homeक्राईमपतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने स्वतःला जाळून घेतले

पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने स्वतःला जाळून घेतले

नंदुरबार | प्रतिनिधी –

पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेने अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याची घटना तालुक्यातील भादवड गावात घडली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -


याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ जुलै रोजी अनिल नथ्थु भिल रा.भादवड ता.जि.नंदुरबार, सुनिल कथ्थु भिल रा.भादवड ता.जि.नंदुरबार यांनी संगनमताने सैलाबाई अनिल भिल वय ३१, रा.भादवड ता.जि. नंदुरबार या महिलेला वारंवार त्रास दिल्याने या त्रासाला कंटाळून त्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले.

तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. याबाबत लक्ष्मण दहारु भिल वय २१ वर्ष धंदा पथरा ता. मजुरी रा. रामि शिंदखेडा जि. धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतिक भिंगारदे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मध्यरात्री

Pahalgam Terror Attack: PM मोदींच्या फ्री हँडच्या निर्णयाने पाकिस्तानची झोप उडाली;...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (29 एप्रिल) लष्कराच्या तीनही...