Thursday, November 21, 2024
Homeधुळेपाकिस्तानच्या अजेंड्याला प्रोत्साहन देवु नका; अलगाववादींची भाषा बोलू नका

पाकिस्तानच्या अजेंड्याला प्रोत्साहन देवु नका; अलगाववादींची भाषा बोलू नका

धुळ्यात पंतप्रधान मोदींचा कॉंग्रेससह आघाडीवर हल्लाबोल

धुळे | प्रतिनिधी– स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षानंतर जम्मु-कश्मीरमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान लागू झाले आहे. मात्र हे कॉंग्रेस आणि त्यांच्या सहकार्‍यांना सहन होत नाहीये. परंतू मी कॉंग्रेस आणि त्यांच्या आघाडीला सांगु इच्छितो की, पाकिस्तानच्या अजेंड्याला देशात प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करू नका. कश्मीरबाबत अलगाववादींची भाषा बोलू नका. हे लक्षात ठेवा, तुमचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत. जोपर्यंत मोदींवर जनतेचा आर्शिवाद आहे, तोपर्यंत कॉंग्रेसवाले कश्मीरमध्ये काहीही करू शकणार नाही. कश्मीरमध्ये आता फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानच चालले, हा मोदीचा निर्णय आहे. आता कोणतीही ताकद कश्मीरमध्ये आर्टीकल ३७० ला परत आणू शकणार नाही, असे सांगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यात कॉंग्रेस आणि त्यांच्या आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.

धुळे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शहरातील खान्देश गोशाळेच्या मैदानावर जाहिर सभा झाली. यावेळी त्यांनी कॉंगेसवर जोरदार प्रहार केला. सभेच्या व्यासपीठावर  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, ना. दादा भुसे, ना.अनिल पाटील, आ.अमरिशभाई पटेल, खा.स्मिता वाघ, डॉ. सुभाष भामरे व धुळे जिल्ह्यातील भाजपा महायुतीचे उमेदवार उपस्थित होते.  

- Advertisement -

पंतप्रधान नरेंदी मोदी पुढे म्हणाले,  देशात कॉंग्रेस पक्ष एका जातीला दुसर्‍या जातीशी लढविण्याचा खतरनाक खेळ खेळत आहे. ते कधीही दलित, वंचित आणि आदिवासींना पुढे जातांना पाहु शकत नाही, हाच कॉंग्रेसचा इतिहास आहे.  गांधी परिवारातील चौथी पिढीतील युवराज आता याच खतरनाक भावनेने काम करीत असल्याचाही आरोप त्यांनी केला.  कॉंग्रेस देशभरातील आदिवासी जातींना लढविण्याचा प्रयत्न करतेय. हाच कॉंग्रेसचा अजेंडा आहे. देशात या पेक्षा मोठा कट असू शकत नाही. त्यामुळे तुम्ही एक है, तो सेफ है, त्यामुळे आपल्याला एकत्र राहून कॉंग्रेसच्या खतरनाक खेळाला असफल करायचे आहे. विकासच्या रस्त्यावर पुढे जायचे आहे.

पुन्हा कट रचण्यास सुरूवात- कॉंग्रेस आघाडीला जसे जम्मु-कश्मीरमध्ये सरकार बनविण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी पुन्हा कट रचण्यास सुरूवात केली आहे. दोन ते तीन दिवसांपुर्वीच जम्मु-कश्मीरच्या विधानसभेत जे काही झाले ते तुम्ही टीव्हीवर पाहीले असेलच. कॉंग्रेस आघाडीने तेथे पुन्हा आर्टीकल ३७० लागू करण्याचा प्रस्ताव पारीत केला आहे. त्यामुळे हे देश स्विकार करेल का? कश्मीरला तोडण्याचा तुम्ही मान्य कराल का? असा सवाल देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

महाराष्ट्रात विकासाची गती कमी होवू द्यायची नाही- देशात महाराष्ट्र आर्थिक प्रगतीवर वेगाने वाटचाल करीत आहे. महायुतीचे सरकार प्रत्यक घटकाच्या विकासासाठी कटीबध्द आहे. राज्यात इन्फ्रास्ट्रक्चरचे  काम, जनकल्याणच्या योजना सुरू आहेत. महिला, युवा, आदिवासींच्या हिताला प्राधान्य दिले जात आहे. ते आता थांबू द्यायचे नाहीये. विकासाची गती कमी होवू द्यायची नाही. त्यामुळे महायुतीसोबत मजबुतीने उभे रहावे. महायुती आपला परिवार, मुलांच्या भविष्यासाठी काम करीत राहील, हा मी तुम्हाला विश्‍वास देता. तुम्ही येवढ्या मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहीले, याबद्दल आभार व्यक्त करीत पंतप्रधान मोदी यांनी सर्व उमेदवारांसोबत पुढे येवून उपस्थितांना प्रणाम केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या