Friday, September 20, 2024
Homeक्राईम’पुष्पा’ स्टाईल कापुन नेली चंदनाची 14 झाडे

’पुष्पा’ स्टाईल कापुन नेली चंदनाची 14 झाडे

धुळे (प्रतिनिधी) । शिरपूर तालुक्यातील थाळनेर शिवारातील शेतातून चोरट्याने पुष्पा स्टाईल चंदनाची 14 झाडे कापुन वाहनात टाकून लंपास केली. त्यांची किंमत 98 हजार रूपये इतकी लावण्यात आली आहे. गावात झालेल्या या पुष्पा स्टाईल चोरीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

भोरखेडा (ता. शिरपूर) येथील भरतसिंग लोटनसिंग राजपुत (वय 65) यांनी त्यांच्या थाळनेर गाव शिवारातील शेतात चंदनाची झाडे लावली आहेत. ही झाडे 12 वर्षाची झालेली होती. दि. 15 ते 16 जुलै दरम्यान रात्रीतून अज्ञात चोरट्याने शेतात प्रवेश करीत चंदनाची एकुण 14 झाडे छाटून त्याची लाकडे वाहनात टाकून चोरून नेली. तर इतर झाडांना करवतीने कट मारून नुकसान केले. सकाळी साडेसात वाजता ही चोरीची घटना उघडकीस आली. याबाबत राजपुत यांनी थाळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय दिलीप पवार हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या