Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशफ्रान्सहून ५ राफेल विमाने भारताकडे झेपावली

फ्रान्सहून ५ राफेल विमाने भारताकडे झेपावली

नवी दिल्ली। New Delhi

भारतात येण्यासाठी ‘राफेल’ फायटर (rafale aircraft) विमानांच्या पहिल्या तुकडीने फ्रान्समधून उड्डाण केले आहे. हे विमान बुधवारी (२९ जुलै) राेजी ७ हजार किमी प्रवास करुन दाखल हाेणार आहे. पहिल्या तुकडीत एकूण पाच विमाने आहेत. या विमानांमुळे भारतीय हवाईदालाची शक्ती अनेक पट्टींनी वाढणार आहे. हरयाणामधील अंबाला एअर फोर्स स्टेशनवर या राफेल विमानांचा तळ असेल. २०१६ साली भारताने फ्रान्स सरकार बरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा ५९ हजार कोटींचा करार केला आहे. या विमानांची शेवटची बॅच डिसेंबर २०२१ पर्यंत भारतीय हवाईदलास मिळेल. भारतात येणारी रफाल लढाउ विमाने आणखी पॉवरफुल बनवले जात असून त्यात हॅमर मिसाइल लावले जात आहे. यासाठी अर्जंट ऑर्डर सुद्धा देण्यात आल्या आहेत. भारतीय हवाई दलाची गरज पाहता, फ्रान्सने ही क्षेपणास्त्रे इतरांसाठी राखीव असली तरीही ते आधी भारताला देणार असल्याचे म्हटले आहे.हॅमर मिसाइलने लडाखसारख्या डोंगराळ भागात मजबूत शेल्टर आणि बंकर सहज उद्ध्वस्त केले जाऊ शकतात

- Advertisement -

राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी IAF चे बारा वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे. उड्डाणवस्थेत असतानाच या विमानांमध्ये इंधन भरण्यात येईल तसेच अंबालामध्ये येण्यापूर्वी ही विमाने यूएईमधील फ्रेंच तळावर लँडींग करतील. फ्रान्समधील तळावरुन उड्डाण करण्यापूर्वी फ्रान्समधील भारतीय राजदूताने भारतीय वैमानिकांबरोबर चर्चा केली

- Advertisment -

ताज्या बातम्या