धुळे | प्रतिनिधी : शहरातून बुलेट दुचाकी चोरणार्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफिने गजाआड केले आहे. आठ जणांच्या टोळीत दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यांनी युट्युबवरून बंद बुलेट सुरु करण्याची माहिती घेत दुचाकी चोरी करीत त्या मित्रांच्या माध्यमातून विक्री केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 9 लाखांच्या चार बुलेट व एक इले. दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
शहरामध्ये चोरी होत असलेल्या बुलेट दुचाकींचा शोध घेण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एलसीबीचे निरीक्षक श्रीराम पवार यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांचे पथक नेमुस त्यास सुचना दिल्या होत्या. आज दि.३० रोजी एक संशयित इसम सुर्या जिम चाळीसगाव रोड परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पथकाला रवाना केले. पथकाने परिसरात शोध घेत एका विधी संघर्षित बालकास पकडले. चोरी केलेल्या बुलेटबाबत विचारले असता त्याने युट्यूबवरुन बंद बुलेट दुचाकी चालू करण्याची माहिती घेवुन एका विधी संघर्षित बालकाच्या मदतीने चोरी करुन त्यांचे मित्र रुपेश ज्ञानेश्वर बारहाते (रा. मोहाडी उपनगर, धुळे), विपुल राजेंद्र बच्छाव (रा. सहजीवन नगर, धुळे), अमित ऊर्फ बंटी संजय गावडे (रा. सहजीवन नगर, धुळे ) (फरार), ऋतिक उर्फ निकी अमृतसिंग पंजाबी (रा.गुरुद्वाराचे पाठीमागे, धुळे) यांचे मदतीने संजय प्रताप गुजराथी ( रा.मोहाडी उपनगर, धुळे)व बलजीतसिंग जलोरसिंग बराड (रा. हनुमान नगर, पाचोरा बसस्थानकाचे पाठीमागे, पाचोरा जि.जळगांव (फरार) यांना विक्री केल्याची कबुली दिली.
या टोळीने धुळे शहर, आझादनगर परिसरातून बुलेट दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून प्रत्येकी दोन लाखांच्या चार बुलेट दुचाकी व एक एक लाख रूपये किंमतीची इले. दुचाकी हस्तगत करण्यात आली. पथकाने रुपेश ज्ञानेश्वर बारहाते, विपुल राजेंद्र बच्छाव,, ऋतिक उर्फ निकी अमृतसिंग पंजाबी, संजय प्रताप गुजराथी, यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार,, सपोनि श्रीकृष्ण पारधी, पोसई. अमरजित मोरे, पोहेकॉ. मच्छिद्र पाटील, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, पोकॉ. योगेश साळवे, पोकॉ. गुलाब पाटील, राजीव गिते, असई संजय पाटील, पोकॉ. अमोल जाधव, सुनील पाटील यांच्या पथकाने केली.