Monday, October 28, 2024
Homeधुळेमसाल्याच्या आड होणारी गुटख्याची तस्करी रोखली

मसाल्याच्या आड होणारी गुटख्याची तस्करी रोखली

धुळे तालुका पोलिसांची कारवाई, ट्रकसह ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे | प्रतिनिधी– गरम मसाल्याच्या आडून इंदूरहून मुुंबईकडे होणारी गुटख्याची  तस्करी धुळे तालुका पोलिसांनी आर्वी शिवारात रोखली. या कारवाईत २१ लाखांचा पान मसाला व सुगंधीत तंबाखु व ३० लाखांची ट्रक असा एकुण ५१ लाख ७० हजार ३५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच चालकाला ताब्यात घेण्यात आले.

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी आज दि.२८ रोजी अधिनस्त अधिकारी व अंमलदारांसह नाकाबंदीचे आयोजन केले होते. त्यादरम्यान इंदूर (मध्यप्रदेश) येथून सीजी ०४-पीएम ४३१८ क्रमांकाच्या ट्रकमधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत सुगंधीत पानमसाल्याची बेकायेशीरपणे मुंबईकडे वाहतूक होत असल्याची माहिती खात्रिशीर मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक विजय पाटील, पोहवा कुणाल पानपाटील,  उमेश पवार, पोकॉं विशाल पाटील, धिरज सांगळे यांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळे तालुक्यातील आर्वी दुरक्षेत्रसमोर नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी सुरू केली. त्यात संशयीत ट्रकला थांबवुन तपासणी केली असता त्यात खाण्यासाठी वापरण्यात येणार्‍या गरम मसाल्याच्या गोण्यांच्या आड राज्यात प्रतिबंधीत पान मसाला व सुगंधीत तंबाकुचा माल मिळून आला. २१ लाख ७० हजार ३५० रूपयांचा पानमसाला व सुबंधीत तंबाखु व ३० लाखांचा ट्रक असा एकुण ५१ लाख ७० हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच ट्रक चालक फय्याजखान रज्जाकखान  (वय ३० रा. खातेगाव ता. कनोद जि.देवास मध्यप्रदेश) यास ताब्यात  घेण्यात आले.

- Advertisement -

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या