Thursday, November 21, 2024
Homeधुळेमहिला सशक्तीकरण मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात

महिला सशक्तीकरण मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केली कार्यक्रमस्थळाची पाहणी

धुळे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महिला सशक्तीकरण मेळाव्याचा जिल्हास्तरीय कार्यक्रम मंगळवार, दि.8 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 येथील मैदान (सुरत बायपास रोड, धुळे) येथे होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज या ठिकाणाची पाहणी केली.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, महापालिका उपायुक्त शोभा बाविस्कर, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाने, अपर तहसीलदार वैशाली हिंगे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी महेश खडसे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री.पापळकर यांनी मुख्य स्टेज, सभा मंडप, लोकप्रतिनिधींची व मान्यवर बैठक व्यवस्था त्याचबरोबर लाभार्थ्यांची बैठक व्यवस्था, महिला बैठक व्यवस्था, शासकीय विभागांमार्फत लावण्यात येणारे विविध स्टॉल, पोलीस बंदोबस्त, वाहतुकीचे नियोजन आदींची पाहणी केली तसेच केलेल्या नियोजनाची माहिती जिल्हाधिकारी श्री. पापळकर जाणून घेतली.

- Advertisement -

यावेळी बोलतांना श्री.पापळकर म्हणाले की, कार्यक्रमाच्या दिवशी येणाऱ्या महिला तसेच नागरीक, लाभार्थ्यांची गैरसोय होवू नये याची दक्षता घ्यावी. वाहनतळ ते कार्यक्रमस्थळावरील मार्गावर वाहतुकीचे नियोजन, महिलांसाठी मोबाईल टायलेटची व्यवस्थीत करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी यंत्रणेला दिल्या. कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांसाठी नाश्ता व पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था करावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या लाभार्थ्यांची बैठक तसेच लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी नेण्याची व्यवस्था करावी. स्टॉलवर भेट देणाऱ्या नागरिकांना संपूर्ण योजनेची परिपूर्ण हिती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी यंत्रणेला दिल्यात. या महिला मेळाव्यास धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला, नागरीक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडीया प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.पापळकर यांनी केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या