Thursday, July 4, 2024
Homeक्रीडालाडकी बहिण योजना, उत्पन्नाच्या दाखल्यासाठी कॅम्प आयोजित करा

लाडकी बहिण योजना, उत्पन्नाच्या दाखल्यासाठी कॅम्प आयोजित करा

आ. जयकुमार रावल यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

दोंडाईचा | प्रतिनिधी

- Advertisement -

राज्य सरकारने लाडकी बहिण योजना सर्वसामान्य महिलांसाठी नुकतीच जाहीर केली आहे. मात्र त्यासाठी लागणार्‍या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अडचणीत येत आहे. त्यामुळे हा दाखल महिलांना तात्काळ कसा मिळेल, यासाठी उपाययोजना कराव्यात. प्रसंगी कॅम्प आयोजित करावा, अशा सुचना माजीमंत्री आ.जयकुमार रावल यांनी जिल्हा व तहसील प्रशासनास केल्या आहेत.
महायुती सरकारच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात लाडकी बहिण ही योजना सर्वसामान्य महिलांसाठी घोषित करण्यात आली आहे. या योजनेसाठी लागणार्‍या कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी महिलांनी तारांबळ उडत आहे. या कागदपत्रात उत्पन्नाचा दाखला आवश्यक असून तो काढण्यासाठी महिलांची तलाठी व तहसील कार्यालयात मोठी गर्दी होत आहे. मात्र उत्पन्नाचा दाखल मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने वैयक्तिक लक्ष घालून उत्पन्नाच्या दाखल्यासाठी कॅम्प आयोजित करावा किंवा स्वंतत्र यंत्रणा निर्माण करावी. म्हणजे सर्वसामान्य महिलांना दिलासा मिळेल, असेही आ. जयकुमार रावल यांनी प्रशासनाला सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या