Sunday, September 8, 2024
Homeधुळेलुटीचा छडा; धुळे शहर पोलिसांनी चौघांना केले जेरबंद

लुटीचा छडा; धुळे शहर पोलिसांनी चौघांना केले जेरबंद

धुळे । (प्रतिनिधी) : शहरातील सुरत बायपासवरील लुटीचा धुळे शहर पोलिसांनी छडा लावला आहे. या गुन्ह्यातील तिघा अनोळखीं लुटारुंसह चौघांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी व एक मोबाईल असा 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वार कुंडाणे (ता. धुळे) येथील मजूर दादाभाऊ बारकु पारधी (वय 33) हा दि.25 जुन रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सुरत बायपासजवळील रस्त्यावरुन सिव्हील हॉस्पीटलकडे जात होता. त्यादरम्यान त्यास मागुन दुचाकीवर आलेल्या तिघा अनोळखींनी अडवित हाताबुक्यांनी मारहाण करीत जखमी केले. तसेच त्याच्याकडील 5 हजाराचा मोबाईल, 1 हजार 600 रूपये जबरीने हिसकावून घेतले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गुन्हेगारांची माहिती प्राप्त करीत असतांना हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार व हिस्ट्रीशिटर असलेला बब्या उर्फ कृष्णा दिनेश गायकवाड (वय 22 रा. राउळवाडी, चितोड रोड, धुळे) व भुषण शिवदास पाचारे (वय 28 रा. नवजीवन नगर, फाशीपुल, धुळे) यांनी त्यांच्या इतर साथीदारांसह केल्याची खात्रीशिर माहिती पोलीस निरीक्षक धिरज महाजन यांना मिळाली. तसेच दोन्ही आरोपी हे मोहाडीनगर पोलीस ठाण्यात दाखल एका गंभीर गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत (जिल्हा कारागृहात) असल्याने त्यांचा ताबा घेण्यात आला. चौकशीत भुषण पाचारे याने साथीदार रोहन अवचित्ते व सागर प्रजापती यांच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार पथकाने शोध घेत रोहन अनिल अवचित्ते (वय 22 रा. खंडेराव महाराज मंदिराजवळ, चितोड रोड, धुळे), सागर जगदिश प्रजापती (वय 22 रा. नवजिवन ब्लड बँकेच्यामागे, सुशिलनगर, धुळे) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी लुटीची कबुली दिली. तसेच गुन्ह्यातील चोरी केलेली रक्कम हिस्ट्रीशिटर बब्या उर्फ कृष्णा गायकवाड यास सोपवुन मौजमस्ती केल्याचे सांगितले. पोलिसांनी भुषण पाचारे यांच्या घरातुन फिर्यादीचा 5 हजारांचा मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (क्र. एमएच 18 एयु 8335) असा एकुण 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. गुन्ह्यात चारही आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सुर्यवंशी करीत आहेत.

- Advertisement -

या पथकाची कामगिरी- ही कामगिरी पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, सहायक पोलीस अधिक्षक ऋषीकेष रेड्डी, पोलिस निरीक्षक धिरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोसई बाळासाहेब सुर्यवंशी, पोहेकॉ दिनेश परदेशी, सचिन गोमसाळे, पोना रविंद्र गिरासे, कुंदन पटाईत, पोकॉ शाकीर शेख, महेश मोरे, प्रविण पाटील, मनिष सोनगिरे, तुषार पारधी, अमित रनमळे, वसंत कोकणी, अमोल पगारे, योगेश ठाकुर, चालक पोकॉ दीपक सैंदाणे यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या