Saturday, November 23, 2024
Homeधुळेवनविभागातील लाचखोर लेखापाल धुळे एसीबीच्या जाळ्यात

वनविभागातील लाचखोर लेखापाल धुळे एसीबीच्या जाळ्यात

लाकुड वाहतुकीच्या परवानगीचे काम करण्यासाठी घेतले 3 हजार

धुळे (प्रतिनिधी)- येथील वनविभागातील उप वनसंरक्षक कार्यालयातील लाचखोर लेखापालला धुळे एसीबीच्या पथकाने गजाआड केले आहे. लाकुड वाहतुकीच्या परवानगीचे काम करुन देण्यासाठी लेखापाल किरण गरीबदास अहिरे यांनी 3 हजाराची लाच स्विकारली. आज सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

- Advertisement -

बहाळ (रथाचे), ता. चाळीसगांव, जि. जळगांव येथील रहिवाशी असलेल्या तक्रारदाराचा लाकुड वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांनी गरताड (ता.धुळे) येथील शेतकऱ्याच्या शेतात लागवड केलेल्या तोडलेल्या सागाच्या १०० झाडांच्या लाकडाच्या ९७ नगाची वाहतुक करण्याचे काम घेतले होते. त्यासाठी गरताड येथील शेतक-याने झाडे तोडुन लाकुड वाहतुकीची परवानगी येण्यासाठी दि. २१ व २३ फेब्रुवारी रोजी वन क्षेत्रपाल, धुळे (ग्रामीण) यांच्याकडे अर्ज केलेला होता. ही परवानगी मिळण्यासाठी तकारदार हे उप वनसंरक्षक कार्यालय, धुळे येथे जावुन पाठपुरावा करीत होते. तेव्हा कार्यालयातील लेखापाल किरण अहिरे यांनी लाकुड वाहतुकीच्या परवानगीचे काम करुन देण्यासाठी तकारदाराकडे ३ हजार रुपये लाचेची मागणी केली. तशी तक्रार काल दि.१०. रोजी तकार तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. या तक्रारीची आज धुळे एसीबीने पडताळणी केली असता लेखापाल किरण अहिरे यांनी तक्रारदाराकडे ३ हजार रुपये लाचेची मागणी करुन लाच स्विकारण्याचे मान्य केले. सायंकाळी सापळा कारवाई दरम्यान लाचेची रक्कम कार्यालयात स्वतः स्विकारतांना लेखापाल अहिरे त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे नवनियुक्त पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण मोरे, प्रविण पाटील, प्रशांत बागुल व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या