Monday, April 28, 2025
Homeक्रीडाविराट कोहलीने तोडला आयसीसीचा नियम

विराट कोहलीने तोडला आयसीसीचा नियम

मुंबई – Mumbai

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चे कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) ने दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या सामन्यात इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2020) दरम्यान एक चूक झाली. या सामन्यात विराटचे चेंडूला Saliva म्हणजे लाळ लावली. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे ICC चा कोविड-१९ प्रोटोकॉलचं उल्लंघन केलं आहे.

- Advertisement -

दुबईत इंटरनॅशनल स्टेडिअममध्ये दिल्ली विरुद्ध सामना खेळत असताना कोहलीने शॉर्ट कवरवर फिल्डींग करताना आपल्याकड येणारा फास्ट बॉल अडवला. त्यानंतर त्या चेंडूवर लाळ लावली. ही घटना तेव्हा घडली जेव्हा दिल्ली तिसऱ्या ओव्हरमध्ये होती.

कोहलीला अगदी लगेच आपली चूक लक्षात आली. त्याने लगेच हात वर करून आपली चूक मान्य केली. या संपूर्ण सामन्यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक ट्विट केलं. शॉच्या कराटे शॉट आणि कोहलीच्या शानदार फिल्डिंगवर सचिनने ट्विट केलं.

तेंडुलकरने ट्विटमध्ये म्हटलं की,’शॉ ने काय अविश्वसनीय शॉट मारला. तर चेंडूवर लाळ लावल्यावर कोहलीची रिऍक्शन देखील पाहण्यासारखी होती. कधी कधी काही गोष्टी सवयीनुसार घडतात.’

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...