Monday, July 1, 2024
Homeधुळेव्यापार्‍यांची एलबीटीच्या जाचातून सुटका करा

व्यापार्‍यांची एलबीटीच्या जाचातून सुटका करा

धुळे व्यापारी महासंघाचे आयुक्तांना निवेदन

धुळे | प्रतिनिधी

महापालिकेची खाजगी ठेकेदाराच्या मदतीने सुरू असलेली एलबीटी वसुलीची मोहिम व्यापार्‍यांसाठी जाचक आणि त्रासदाय ठरत असून ही मोहिम थांबावावी, अशी मागणी आज धुळे व्यापारी महासंघातर्फे आयुक्त अमिता दगडे- पाटील यांच्याकडे करण्यात आली. तसे निवेदनही त्यांना देण्यात आले.
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, खेमजी पटेल, भीमजी पटेल, जयगोपाल दादलानी, प्रशांत देवरे, सुमित रुणवाल, साबीर शेख आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, मनपातर्फे खाजगी ठेकेदाराकडून स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) वसुलीबाबत निर्धारण प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार मनपा उपायुक्तांच्या स्वाक्षरीने व्यापारी बांधवांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. परंतु, दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्याने कमी उलाढाल असलेल्या व्यापारी वर्गाकडे कागदपत्रे उपलब्ध नाहीत. एलबीटी सुरू झाल्यानंतर पुरेशी माहिती नसतानाही अनेक व्यापार्‍यांनी चुकून एलबीटी नंबर घेतला आहे. असे व्यापारी पूर्णपणे पेचात अडकले आहेत. तसेच याबाबत विचारणा करण्यासाठी एलबीटी कार्यालयात गेल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याठिकाणी दोन ते तीन तास व्यापार्‍यांना ताटकळत ठेवण्यात येते.
सद्य:स्थितीत एलबीटी कार्यालयात चुकीच्या लोकांचा वावर वाढला असून तेथे व्यापार्‍यांना नीट वागणूक मिळत नाही. तसेच पुर्वीच्या ठेकेदाराला दिलेल्या कागदपत्रांची पुन्हा व्यापार्‍यांकडून मागणी केली जात आहे. ठेकेदाराचे कर्मचारी नेमके कोण हे देखील समजत नाही. त्यामुळे ठेकेदाराच्या कर्मचार्‍यांचे नाव, मोबाईल नंबरसह यादी उपलब्ध करून देण्याचीही मागणीही व्यापार्‍यांनी निवेदनातून केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या