Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमशारदाची ५ लाखांना सुपारी; मांत्रिकासह चौघांना ताहराबादमधून अटक

शारदाची ५ लाखांना सुपारी; मांत्रिकासह चौघांना ताहराबादमधून अटक

पश्‍चिम देवपूर पोलिसांचा कौशल्यपुर्ण तपास

धुळे | प्रतिनिधी –  शहरातील देवपुर भागात असलेल्या वलवाडी शिवारातील विवाहिता शारदा बागुल हीच्या खून प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. तिच्या पतीनेच खुनाची ५ लाखांना सुपारी दिली होती. त्यानुसार पश्‍चिम देवपूर पोलिसांनी अत्यंत कौशल्यपुर्ण तपास करीत मांत्रिकासह चौघा सुपारी बहाद्दरांना आज पहाटे ताहराबाद येथून अटक केली. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे या प्रकरणात आता एकूण १० आरोपी झाले असून, त्यापैकी ९ जण अटकेत आहे. तर एक संशयित फरार आहे.

दि.३० मे रोजी भुषण महाजन (रा. भडगाव, जि. जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्याची बहिण शारदा उर्फ पूजा कपिल बागुल (वय ३८) हिच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार, शारदा हिचा तिच्या सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ होत होता. तसेच तिच्या पतीचे कॉलेज काळातील मैत्रीण प्रज्ञा कर्डीले या महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यास विरोध केल्यामुळे तिला पेस्टिसाइडचे इंजेक्शन देऊन, डोक्यावर वार करून तिचा खून करण्यात आला. याप्रकरणी पती कपिल बागुल, सासरे बाळु बागुल, सासू विजया बागुल, नणंद रंजना माळी आणि कपिलची प्रेयसी प्रज्ञा कर्डीले या पाच जणांना सुरुवातीला अटक करण्यात आली होती. पुढील तपासात या आरोपींनी सुपारी देवुन खून केल्याची कबुली दिल्यानंतर भुषण काळे, यश उर्फ जयेश जगताप, सचिन उर्फ बब्या जाधव, साई उर्फ आकाश माळी आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक सर्व (रा. जुने धुळे) यांच्या सहभागाचे धागेदोरे समोर आले. यातील चार जणांना अटक करण्यात आली असून, साई उर्फ आकाश माळी हा अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तुषार देवरे, पोसई साईनाथ तळेकर करीत आहेत.

- Advertisement -

मांत्रिकाशी ओळख अन कटाची सुरूवात
पोलीस तपासात अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. शारदाचा पती कपिल बागुल याची ओळख एका जादूटोणा करणार्‍या बोगस भूषण बापू काळे याच्याशी (वय २० रा. बर्फ कारखान्याजवळ, जुने धुळे) झाली होती. काळे मांत्रिक असून लोकांना फसवून त्यांचे आजार बरे केल्याचा दावा करतो. कपिल आणि त्याची आई विजया काळे यांनी मांत्रिका भुषण आणि त्याचे साथीदार होमगार्ड सचिन उर्फ बब्यादौलत जाधव (वय ३२), नुकताच बारावी नापास झालेला यश उर्फ जयेश अनिल जगताप (वय १९), साई उर्फ आकाश मधुकर माळी, एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा यांनी मयत शारदा हिला मारण्याचा प्लान केला.

YouTube video player

पाच लाख ठरले, दीड लाख दिले
कपिलची आई हिचा शारदाला लवकर मारले पाहिजे, असा आग्रह करत होती. याकरिता प्रथम प्रज्ञाने ५० हजार रुपये मांत्रिक भूषणच्या अकाउंटवर पे केले आणि कपिलने १ लाख रोख सर्वांना दिले. संपूर्ण मदत करण्याकरिता ५ लाख ठरले होते. दि.२९ मे रोजी जयेश जगताप आणि दोन जणांनी दुकानातून इंजेक्शन सलाईन आणि पेस्टिसाइड आणले. पती कपिलने पूजाला इंजेक्शन, सलाईन दिले आणि ते शेजारच्या रूममध्ये तिघ शारदाला मारण्याची वाट पाहत होते. तेव्हा कपिलची आई विजया हिने चहा करू का? हे पण विचारले. पूजा मयत झाल्याचे कन्फर्म झाल्यावरे तिघे सर्व आणलेले सामान घेवुन निघून गेले.

हत्याकांडात प्रत्येकाचे कारण वेगवेगळे
शारदा उर्फ पुजा बागुल हत्याकांडप्रकरणाच्या तपासात प्रत्येक आरोपीमागे एक स्वतंत्र कारण असल्याचे पुढे आले आहे.
.पती कपिल बागुल- एक्स्ट्रा मॅरिटिल अफेर आणि प्रज्ञाशी लग्न करणे.
. कपिलची आई विजया बागुल- शारदाबरोबर भांडणे आणि कपिलचे दुसरे लग्न प्रज्ञाबरोबर लावणे.
. प्रज्ञा कार्डिले- तिचा घटस्फोट अंतिम टप्प्यात असून कपिलशी लग्न करणे.
. मांत्रिक भूषण काळे- व्यसन (टर्मिल इंजेक्शन) करतो. त्यामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि झोप येत नाही. घरच्यांना आपणही आता पैसे मिळवत आहोत हे दाखवणे. झटपट पैसा कमाविणे.
५. सचिन जाधव-मुलाची ट्रीटमेंट आणि स्वतःची व्यसन ( हाही टर्मिन इजेक्शन घेतो) झटपट पैसा कमाविणे.
.जयेश जगताप आणि अल्पवयीन मुलासह दोघे- मांत्रिक भूषणचा दबाव आणि खूप पैसे झटपट मिळतील आणि कपिल सगळं नंतर मॅनेज करणार या अटींवर गुन्ह्यात सहभागी झाला होता.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...