Saturday, November 23, 2024
Homeक्राईमशाळेचा मुख्याध्यापकही निघाला लाचखोर !

शाळेचा मुख्याध्यापकही निघाला लाचखोर !

वेतन फरकाच्या रकमेसाठी १० हजार घेतांना रंगेहाथ पकडले

जळगाव । थकित वेतनातील थकीत वेतनातील फरकाची रक्कम मंजूर करण्याच्या मोबदल्यात १० हजाराची लाच घेणार्‍या लाचुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रात खडबड उडाली आहे. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. संदीप प्रभाकर महाजन वय-४४, रा. नेपाने ता. एरंडोल असे मुख्याध्यापकाचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती, एरंडोल तालुक्यातील एका गावातील शाळेत तक्रारदार हे शिपाई म्हणून पदावर नोकरीला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे वेतनातील फरकाची रक्कम रक्कम २ लाख ५३ हजार ६७० रुपये मंजूर करण्याचा प्रस्ताव त्यांनी जळगाव माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक त्यांच्याकडे पाठवला होता. दरम्यान हा प्रस्ताव मंजूर करून देतो असे सांगून याच शाळेत मुख्याध्यापक असणारे संदीप महाजन यांनी मंजूर रकमेच्या ५% म्हणजे १२,५०० रुपयांची लाचेची मागणी केली. दरम्यान तडजोडी यांची १० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव येथील विभागाला तक्रार दिली. त्यानुसार पथकाने गुरुवारी २७ जून रोजी दुपारी सापळा १० हजाराची रक्कम स्वीकारताना मुख्याध्यापक संदीप महाजन यांना पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी कासोदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या