Thursday, October 1, 2026
Homeक्राईमशिरपूरचा वरिष्ठ तंत्रज्ञ ४०० रूपयांची लाच घेतांना रंगेहात

शिरपूरचा वरिष्ठ तंत्रज्ञ ४०० रूपयांची लाच घेतांना रंगेहात

धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

धुळे | प्रतिनिधी– महावितरण कंपनीच्या शिरपूर उपविभागातील वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र धोबी यास ४०० रूपयांची लाच घेतांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली.

शिरपुर येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराचे वरवाडे येथे घराचे बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी तक्रारदार यांच्या घराच्या विज पुरवठयाच्या वायरचा अडथळा येत असल्याने ती वायर दुसर्‍या खांब्यावरुन जोडुन मिळण्यासाठी तक्रारदार यांनी महावितरणच्या शिरपूर उपविभाग कार्यालयात जावुन वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र धोबी यांची भेट घेत त्यांना त्यांच्या विज पुरवठयाची वायर दुसर्‍या खांब्यावरुन जोडुन देण्याची विनंती केली. या कामाच्या मोबदल्यात धोबी यांनी ५०० रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी दि.८ रोजी दुरध्वनीव्दारे धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) माहिती दिली. त्यावरुन एसीबीच्या पथकाने दि.९ रोजी शिरपुर येथे जावुन तकारदार यांची तक्रार नोंदवुन तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली. तेव्हा वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र धोबी यांनी तक्रारदाराकडे तडजोडीअंती ४०० रुपये लाचेची मागणी केली. त्यानुसार पथकाने आज दि.१० रोजी सापळा लावला असता वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र धोबी हे लाचेची रक्कम स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुध्द शिरपुर शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, मकरंद पाटील, प्रविण पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज घेण्यासाठी झुंबड; दाखल करणार्‍यांची मात्र प्रतीक्षा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणात होत...