Saturday, November 23, 2024
Homeधुळेशिरपूरात आयजींच्या पथकाचा जुगार अड्डयावर छापा

शिरपूरात आयजींच्या पथकाचा जुगार अड्डयावर छापा

३१ जण ताब्यात, १० लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे | प्रतिनिधी

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या पथकाने काल सायंकाळी शिरपूर शहरातील एका बंगल्यात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकला. जुगार खेळणार्‍या ३१ जणांना रंगहात पकडले. त्यांच्याकडून एकूण रोकड, १५ दुचाकींसह १० लाख ३१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर शहरातील नवजिवन किराणा दुकानामागे असलेल्या बाबुराव उखा खैरनार यांच्या मालकीच्या बंगल्यातील एका पत्रटी शेडमध्ये जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने काल दि. १४ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा तेथे ३१ जण जुगार खेळतांना आढळून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून २ लाख ३० हजार ४०० रूपयांची रोकड, २० हजार रूपये किंमतीचे चार मोबाईल जप्त केले. यासह चार पत्त्यांची कॅट, १ हजार २०० रूपये किंमतीचे जुगाराचे साहित्य व ७ लाख ८० हजार रूपये किंमतीच्या १५ दुचाकी असा एकूण १० लाख ३१ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

- Advertisement -

याबाबत विशेष पोलीस महानिरिक्षक यांच्या पथकातील पोना प्रमोद मंडलीक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाबुराव उखा खैरनार याच्यासह संदीप भगवान पाटील, गणेश दगा पाटील, दिलीप देवीसिंह राजपूत, अभिषेक संजय अहिरे, प्रविण जगन्नाथ पाटील, गणेश रोहिदास धाकड, समाधान अशोक पाटील, जयेश रोहिदास चौधरी, आकाश संजय चौधरी, मनोज बळवंत पाटील, सुनिल लोटन बोडसे, शौकीन चैतराम कुवर, महेश वसंत कोळी, रविंद्र बारकु भोई, अतुल दगडू पाटील, रविंद्र सुंद्रे पावरा, सन्नी प्रदीप पाटील, रविंद्र लोटन सावळे, उदय वामन पाटील, योगेश विजय शिंपी, सुनिल दगा कोळी, अमोल अशोक माळी, अजिमबेग युनुस बेग, रंकेश विजय गोडसे, सुनिल नंदु खैरनार, किरण अर्जुन पारधी, मोहसिन गुलाब मेहतर, कमलसिंह रजेसिंह यादव, संजय गंभीर पाटील, प्रवीण नरेंद्र मराठे या ३१ जणांविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रोशन निकम हे करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या