धुळे | प्रतिनिधी- शिरपूर शहरातील रसिकलाल पटेल नगरात चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडीयाचे एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न केला. काल मध्यरात्री हा प्रकार घडला. चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले असून याप्रकरणी शहर पोलिसात दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नितीन सुनिल पाठक (वय 33 रा. प्लॉट नं. 17 नवनाथ नगर, वाडीभोकर रोड, शिरपूर) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, रसिकलाल पटेल नगरात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम असून दि.30 रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास तोंडाला रूमाल बांधलेल्या दोन इसमांनी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम कापून त्यातील रोकड चोरी करण्याचा प्रयत्न केेला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पीएसआय दरवडे करीत आहेत.
ताज्या बातम्या
व्हॅट टॅक्समधील तफावतीमुळे बेकायदेशीर मद्यविक्रीत वाढ
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
परमीट रुम व वाईन शॉप यांच्यावरील व्हॅट टॅक्स बाबतच्या तफावतीच्या पध्दतीमुळे बेकायदेशीर मद्य विक्रीत वाढ होवून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असल्याचा...