धुळे | प्रतिनिधी- शिरपूर शहरातील रसिकलाल पटेल नगरात चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडीयाचे एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न केला. काल मध्यरात्री हा प्रकार घडला. चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले असून याप्रकरणी शहर पोलिसात दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नितीन सुनिल पाठक (वय 33 रा. प्लॉट नं. 17 नवनाथ नगर, वाडीभोकर रोड, शिरपूर) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, रसिकलाल पटेल नगरात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम असून दि.30 रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास तोंडाला रूमाल बांधलेल्या दोन इसमांनी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम कापून त्यातील रोकड चोरी करण्याचा प्रयत्न केेला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पीएसआय दरवडे करीत आहेत.
ताज्या बातम्या
Ahilyanagar : केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिकांकडे आता गावचा कारभार
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अंगणवाडी पर्यवेक्षिका, केंद्रप्रमुख, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी अशा जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांकडे आता गावचा कारभार आला आहे. याबाबतचे आदेश बुधवार (दि.9) रोजी जिल्हा...




