धुळे (प्रतिनिधी)- शिरपूर तालुका येथे पैशाचा पाऊस पाडून देऊ, असे बनावटी करून काल पळासनेर जंगलात फायरिंगची घटना घडली. या प्रकाराची पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गंभीर दखल घेतली. त्यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातून चार जणांना जेरबंद घेतले.
शिरपूर तालुक्यात पैशांचा पाऊस पाडून देवु, असे बनावटी करित काही जणांनी काल पळासनेरातील जंगल परिसरात हवेत फायरिंग केली. या प्रकाराची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलिसांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून चौकशी सुरू केली. याप्रकरणी काल रात्री उशिरा शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. तसेच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या सहपथकाने थेट मध्यप्रदेश गाठले. रात्रभर शोध मोहीम राबवून चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले. तर आणखी एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संशयीत आरोपींना धुळ्यात आणून पुढील कारवाई केली जाणार असून आरोपींनी पैशाचा पाऊस पाडण्याचे बनावटीकरण का केले, या टोळीत आणखी कोणाचा समावेश आहे का? हे समोर येईल.