Saturday, July 6, 2024
Homeक्राईमशिरुडदिगर येथून पाच लाखाचे सोन्याचे दागिने लंपास

शिरुडदिगर येथून पाच लाखाचे सोन्याचे दागिने लंपास

- Advertisement -

नंदुरबार | प्रतिनिधी-

शिरुडदिगर (ता.शहादा) येथे अज्ञात चोरटयांनी घरफोडी करत ५ लाख ८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. याबाबत शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१ ते २ जुलै दरम्यान शहादा तालुक्यातील शिरुड दिगर येथील रविंद्र पुंजरु जाधव यांच्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडुन अज्ञात चोरटयांनी आत प्रवेश केला.

चोरटयांनी घरातील १ लाख २० हजार रुपये किमतीचे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, ८० हजार रुपये किमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ८० हजार रुपये किमतीच्या २० ग्रॅम वजनाच्या २ नग सोन्याची बांगडया,

६० हजार रुपये किमतीच्या १० ग्रॅम वजनाच्या ०२ नग सोन्याची बांगडया, ८० हजार रुपये किमतीची २० ग्रॅम सोन्याची पोत, ४० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे कर्णफुल व सोन्याचे काप,

४८ हजार रुपये किमतीची १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असा एकुण ५ लाख ८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. याबाबत श्री.जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या