Sunday, June 14, 2026
Homeक्राईमशेतात लपविलेला 39 लाखांचा बनावट दारूचा साठा जप्त

शेतात लपविलेला 39 लाखांचा बनावट दारूचा साठा जप्त

साक्री पोलिसांनी सलग दुसरी धडक कारवाई; फरार जयेश गुंजाळवर आणखी एक गुन्हा

धुळे : (प्रतिनिधी) | तालुक्यातील म्हसदी येथील जयेश गुंजाळ याच्या शेवग्याच्या शेतात छापा टाकत लपवून ठेवलेला बनावट दारुचा 39 लाखांचा साठा पोलिसांनी जप्त केला. काल सायंकाळी ही धडक कारवाई करण्यात आली. दरम्यान पाच दिवसांपुर्वीच साक्री पोलिसांनी म्हसदी गाव शिवारातील गुंजाळ याच्या घरासमोरून दहा लाखांचे वाहन व 67 लाखांचा बनावट दारूचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी जयेश गुंजाळ विरोधात आणखी एक गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

म्हसदी (ता. साक्री) गावशिवारातील वसंत शामराव गुंजाळ यांच्या मालकीच्या शेतात त्यांचा मुलगा जयेश गुंजाळ (रा. म्हसदी) हा खेडत असलेल्या शेवगा पिकामध्ये त्याने अवैध दारुसाठा लपविल्याची खात्रीशीर माहिती साक्री पोलिस ठाण्याचे एपीआय जयेश खलाणे यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या सुचनेनुसार एपीआय अनिल बागुल, पीएसआय प्रसाद रौंदळ, साळुंखे व पथकाने तेथे छापा टाकला असता दारूसाठा मिळुन आला. 34 लाख 56 हजार रूपयांचा रॉयल ब्यु माल्ट व्हिस्कीच्या 180 एमएलच्या बाटल्याचे एकुण 360 खोके (प्रत्येक खोक्यात 48 सिलबंद बाटल्या), 4 लाख 70 हजार 400 रुपये किंमतीची देशी दारु सुगंधी संत्रा 180 मिलीचं एकुण 140 खोके (प्रत्येक खोक्यात 48 सिलबंद बाटल्या) व 600 रूपयांची पिवळया रंगाची ताडपत्री असा एकुण 39 लाख 27 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जयेश वसंत गुंजाळ याने मानवी जिवितास हानीकारक व विना बेंच आणि मॅन्युफॅक्चर नंबर आणि विक्री किंमत नसलेला वरील बनावट दारुसाठा विनापरवाना बेकायदेशिर विक्री करण्याच्या उद्देशाने पिवळया रंगाच्या ताडपत्री खाली लपवून ठेवलेला होता. म्हणुन जयेश गुंजाळ याच्याविरुध्द पोहेकॉ शांतीलाल पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे. तसेच त्याच्याविरुद्ध दि.4 रोजी एक गुन्हा दाखल आहे. दरम्यान जयेश गुंजाळ हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या अटकेनंतरच हा दारू साठा कोठून आणला गेला, कुठे विक्री होणार होता, याची माहिती स्पष्ट होणार असल्याची माहिती सपोनी खलाणे यांनी देशदूतशी बोलताना दिली

- Advertisement -

ही कारवाई पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, एलसीबीचे पीआय श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय जयेश खलाणे, अनिल बागुल, विकास शेवाळे, पीएसआय प्रसाद रौंदळ, राजेंद्र साळुंखे, एएसआय राजु जाधव, पोहेकाँ संजय गोकुळ शिरसाठ, शांतीलाल पाटील, पोकाँ तुषार जाधव, पोना आनंद चव्हाण, पोकॉ साईनाथ पवार, धनंजय चौधरी यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : महायुतीचा ‘हॉटेल पॉलिटिक्स’वरती भर; तर मविआत...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) आकडे पाहिले तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra...