Saturday, May 4, 2024
Homeनगरश्रीगोंदा : जलकुंभ कामाच्या चौकशीचे आदेश

श्रीगोंदा : जलकुंभ कामाच्या चौकशीचे आदेश

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

नगरपरिषद हद्दीतील दत्तवाडी येथे पाणीपुरवठा योजनेचा निधी प्रशासकीय मान्यता न घेता या कामासाठी नेमलेल्या ठेकेदारास काम पूर्ण झाल्यानंतर

- Advertisement -

नगराध्यक्ष यांची नमुना 64 वर सही नसतानाही बेकायदेशीरित्या कामाचे बिल अदा करण्यात आले असून या जलकुंभाच्या कामामध्ये पालिकेच्या तत्कालीन प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी यांनी मिळून नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान केले असल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्याकडे केली आहे.

त्यांनी उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा पारनेर यांना चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती तक्रारदार सतीश बोरुडे व अ‍ॅड. समित बोरुडे यांनी दिली.

नगरपरिषदेने शहराला नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी घोड धरणावरून 50 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना णखऊडडचढ या केंद्रशासनाच्या योजनेतून पूर्ण केली. याच पाणीपुरवठा योजनेचा निधी कोणतीही प्रशासकीय व तांत्रिक मान्यता नसताना तसेच कामाचे टेंडर न काढता दत्तवाडी येथे पंचवीस लाख रुपये खर्चाच्या दोन दशलक्ष लिटर क्षमतेचा उंच जलकुंभ (पाण्याची टाकी) बांधण्यात आला.

सदरील कामासाठी सर्वसाधारण सभा घेऊन प्रशासकीय व तांत्रिक मान्यता घेतली असल्याचे मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले. मात्र शासन निर्णयानुसार सक्षम प्राधिकार्‍यांची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्राप्त केल्याशिवाय निविदा प्रसिद्ध करू नयेत व कार्यादेश देऊ नयेत, असे असतानाही सर्व नियम धाब्यावर बसवून आधी जलकुंभाचे बांधकाम पूर्ण करून त्यानंतर तांत्रिक मान्यता मिळवून तत्कालीन मुख्याधिकारी विश्वंभर दातीर, तत्कालीन नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी संबंधित ठेकेदार आर. एम. कातोरे अँड कंपनीकडून दत्तवाडी येथील जलकुंभाचे काम पूर्ण करून घेतले. दि. 2 मार्च 2021 रोजी करण्यात आली. दरम्यान जिल्हा प्रशासन अधिकारी द. ग. लांघी यांनी उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा पारनेर यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

सदरील दत्तवाडी परिसरातील नागरिकांनी जलकुंभ बांधल्यापासून आजपर्यंत नळ कनेक्शनची मागणीच केली नसल्याची पालिका प्रशासनाकडून माहिती मिळाली असल्याने सदरील जलकुंभ नेमका कोणत्या उद्देशासाठी बांधण्यात आला? असा सवाल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या