Friday, November 22, 2024
Homeक्राईमसख्ये भाऊ पक्के वैरी...! ...

सख्ये भाऊ पक्के वैरी…! नवे काठोरेत मोठ्या भावाने केला लहान्याचा खून

शिरपूर: शेत जमिनीच्या वादातून दगड मारून फेकल्याने भावाचा मृत्यू

धुळे | प्रतिनिधी
सख्ये भाऊ पक्के वैरी झाल्याची म्हण जिल्ह्यात खरी ठरली आहे. नवे कोठारे (ता.धुळे) येथे पत्नीला शिवीगाळ केल्याच्या रागातून मोठ्या भावानेच लहान भावास लाकडी दांडक्याने मारहाण करीत त्याचा खून केला. तर शिरपूर तालुक्यातील कोडीद शिवारात शेत जमिनीच्या वादातून भावानेच दगड मारून फेकल्याने भावाचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटनांनी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पत्नीला शिवीगाळ केल्याचा राग- धुळे तालुक्यातील नवे कोठरे गावात पत्नीस शिवीगाळ केल्याचा राग आल्याने मोठ्या भावाने लहान भावाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या लहान भावाचा मृत्यू झाला. सुका बाळु कोळपे (वय ५० रा. नवे काठोरे ता. धुळे) असे त्याचे आहे. काल दि. २ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
मोठा भाऊ मुका बाळु कोळपे (वय ६० रा.नवे कोठोरे) याची पत्नी जयाबाई हिस सुका कोळपे याने शिवीगाळ केली. त्याचा राग येवून मुका कोळपे याने सुका यास लाकडी दांडक्याने पाठीवर, हातावर व डोक्यावर बेदम मारहाण करीत त्याचा खून केला. याबाबत पिरन दगडु कोळपे यांनी सोनगीर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून मुका कोळपे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कायदा कलम १०३/१ /प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुका कोळपे याला अटक केली. असून पुढील तपास सपोनि कृष्णा पारधी हे करीत आहेत.

दगड मारून फेकल्याने भावाचा मृत्यू- शिरपूर तालुक्यात शेत जमिनीच्या वादातून दगड मारून फेकल्याने भावाचा मृत्यू झाला. याप्रकरणी दगड मारणार्‍या भावावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल दि. २ रोजी अकरा वाजेच्या सुमारास घडली.
आमशा देशा पावरा (रा. रूपसिंगपाडा फत्तेपूर पो. कोडीद ता.शिरपूर) असे मयताचे नाव आहे. त्यास भाऊ मोवाशा देशा पावरा (वय ३४) याने शेत जमिनीच्या वादातून दगड मारून फेकला. त्यात गंभीर जखमी होवून आमशा पावरा याचा मृत्यू झाला. याबाबत सियाराम रतिलाल पावरा (वय २१) याने दिलेल्या फिर्यादीवरून मोवाशा पावरा याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०५, १२५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी मोवाशा पावरा यास अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक कृष्णा पाटील हे करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या