धुळे (प्रतिनिधी)- सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील साक्री तालुक्यातील अक्कलपाडा ते भदाणे गावाजवळ भीषण अपघात झाला. भरधाव कु्रझरने कारला धडक दिली. त्यात कारमधील दाम्पत्य ठार झाले. तर दोन्ही मुले जखमी झाले. काल दि.२२ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
किरण प्रकाश पाटील व जयश्री किरण पाटील (रा. हिसपुर ता. पारोळा जि. जळगाव) अशी मृत दाम्पत्याचे नाव आहे. ते मुलगी खुशी व मुलगा समर्थ यांच्यासह दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या डीएन ०९ एफ ०८५८ क्रमांकाच्या कारने जात होते. त्यादरम्यान त्यांना अक्कलपाडा ते भदाणे गावाजवळ मागून भरधाव येणार्या एमएच ५० ए ४६५६ क्रमांकाच्या क्रुझर वाहनाने उजव्या बाजुने कट मारला. त्यामुळे कार खड्डयात जावून उलटली. त्यात कारमधील दाम्पत्य ठार झाले. तर त्यांची दोन्ही मुले जखमी झाली. अपघातानंतर क्रुझर चालक पळून गेला. याबाबत ट्रकचालक दीपक अशोक शिंदे (रा. मोहाडी उपनगर, धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्रुझर चालकावर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई धनवटे करीत आहेत.