Friday, October 2, 2026
Homeक्राईमसासरच्या त्रासाला कंटाळून जावयाची आत्महत्या

सासरच्या त्रासाला कंटाळून जावयाची आत्महत्या

पत्नीसह पाच जणांवर गुन्हा

धुळे | प्रतिनिधी– सासरच्या त्रासाला कंटाळून जावयाने आत्महत्या केली. त्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रविण भीमराव अहिरे (वय ४२ रा. शिरपूर) असे मयताचे नाव आहे. तो गेल्या १५ ते २० वर्षांपासून दि.२७ जुलैपर्यंत सासरे दयानंद बाबुराव शिरसाठ यांच्या शिरपूर येथील घरी राहत होता. त्यादरम्यान त्यास सासरे दयानंद शिरसाठ, शालक सागर बाबुराव शिरसाठ, सासू रंजनाबाई दयानंद शिरसाठ, पत्नी मनिषा प्रविण अहिरे सर्व (रा.टेकवाडे) व साडू मनोज गोपीचंद ढिवरे (रा.थाळनेर) हे वारंवार त्रास देत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून प्रविण अहिरे याने आत्महत्या केली. अशी फिर्याद भीमराव दामु अहिरे (वय ८० रा. सावखेडा ता. अमळनेर) यांनी शिरपूर शहर पोलिसात दिली आहे. त्यावरून वरील पाच जणांवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दरवाडे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....