सोनगीर | वार्ताहर
येथील बालाजी नगरात राहणार्या तरुणीचा बोअरवेलला विज पुरवठा करणार्या वीज वाहिनीचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कविता राजेंद्र बाविस्कर (वय २५) असे मयत तरूणीचे नाव आहे. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असून कामासाठी व वापरण्यासाठी परिसरात बोअरवेल केलेला आहे. आज दि. ४ रोजी सकाळी कविता हिने नवीन बांधकामावर पाणी मारण्यासाठी बोअरवेल सुरू केला असता कामावर वापरण्यात येत असलेली लोखंडीदाराचा बोअरवेलचा वायरला कट लागल्यामुळे लोखंडी दारात विद्युत प्रवाह उतरला. त्याचा अंदाज कविता हिला न आल्याने मोटार बंद करण्यासाठी जात असताना दाराला हाताचा स्पर्श होताच परिसरात ओलावा असल्याने कविताला जोरदार विजेचा धक्का बसला. बराच वेळ हा प्रकार कोणाचा लक्षात आला नाही. थोड्या वेळात बांधकाम ठेकेदार दिलीप पाटील व त्याचे सहकारी कामावर आले असता त्याला सर्व प्रकार लक्षात येताच त्यांनी लाकडी दाड्याने प्रवाहित वीज वायर बाजूला केली. त्यानंतर कविता ही खाली कोसळली. तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.
दरम्यान कविता ही शिक्षण घेत असून तिचे वडिल राजेंद्र बाविस्कर हे शिक्षक आहेत. त्यांना गेल्या १० ते १२ वर्षांपासून अपघातात अपंगत्व आल्याने ते घरातच अंथरुणावर खिळून आहेत. कविता हिच्या दोन मोठ्या बहिणीचा विवाह झाला असून मोठा भाऊ कल्पेश पुणे येथे नोकरी करतो. परिवाराची सर्व जबाबदारी कवितांवर असल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शवविच्छेदन केल्यानंतर रात्री कवितावर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील बालाजी नगर येथे राहणार्या कविता राजेंद्र बाविस्कर वय २५ या तरुणीचा आज सकाळी ११,३० वाजेचा सुमारास बोअरवेल ला विज पुरवठा करणार्या वीज वाहिनीचा शॉक लागल्याने या तरुणीचा मृत्यू झाला.