Friday, November 22, 2024
Homeराजकीयसोयी प्रमाणे नाती जोडायची हीच भाजपाची संस्कृती

सोयी प्रमाणे नाती जोडायची हीच भाजपाची संस्कृती

खा.सुप्रिया सुळे यांचे भाजपावर टिकास्त्र; शिंदखेडा येथे राष्ट्रवादीचा महिला मेळावा

शिंदखेडा । प्रतिनिधी- सोयी प्रमाणे नाती जोडायची हीच भाजपाची संस्कृती असल्याचे प्रतिपादन बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

शिंदखेडा येथील राष्ट्रवादीच्या महिला व पदाधिकारी मेळाव्यात त्या बोलत होत्या. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, अठरा वर्षापूर्वी भाजपा हा ओरीजनल पक्ष होता तसा तो आता राहिलेला नाही, आताचा भाजपा पक्ष हा वाशींग मशिन झाला आहे. सत्ता, पैसा व यश हे येते व जाते.आम्हीच कायमस्वरुपी सत्तेत राहू या  भ्रमात राहू नका. हा देश लोकशाही मार्गाने चालतो,दडपशाहीने नाही असे त्यांनी सांगितले. लोकसभेचा शॉक बसताच यांना  लाडकी बहिण, लाडका भाऊ आठवू लागले.लाडक्या बहिणीच्या योजनेचा प्रचार करण्यासाठी महायुतीचे सरकार दोनशे कोटी रुपये खर्च करत आहे.हे सरकार  एकदमच  स्वार्थी आहे.दोन तीन महिन्यात विधानसभेची निवडणूक लागेल,येणार्‍या निवडणूकीत महाविकास आघाडी ही पारदर्शक सरकार देणार असल्याची ग्वाही खा. सुळे यांनी दिली. यावेळी सुरुवातीला राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी म्हणाल्या की, आम्ही शाश्वत विकासाच्या योजना राबविणारे सरकार देऊ.या प्रसंगी संदीप बेडसे व कामराज निकम यांनी आपल्या भाषणात शिंदखेडा तालुक्याचे आमदार रावलांच्या दडपशाही व दादागिरी बद्दल जोरदार टिका केली.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जितेद्र मराठे,महिला अध्यक्षा उषाताई पाटील,अ‍ॅड. एकनाथ भावसार यांचीही भाषणे झाली. संदीप बेडसे म्हणाले, जयकुमार  रावल यांची दडपशाही गाडून टाकू. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेचा वापर केला जातो तो धक्कादायक आहे. कोणी विरोधात बोलले की गुन्हे दाखल केले जात आहे. मध्यतरी शामकांत सनेर यांना स्थानबद्ध केलेे.

- Advertisement -

जुई पाटील-देशमुख म्हणाल्या, सारंगखेडा चेतक फेस्टिवल घोटाळा कोट्यवधीचा केल्याचा आरोप त्यांनी केला. कामराज निकम म्हणाले जयकुमार रावल यांनी वीस वर्षापासून हुकूमशाही सुरू केली असून त्यांना प्रामाणिकपणे विजयी करण्यासाठी मी प्रयत्न केले पण त्यांचा पराभव कसा करायचा याचे तंत्रही मला माहित आहे. त्यांचा पराभव निश्चित आहे कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, पोपटराव सोनवणे, आधार पवार, विठलसिंग गिरासे, एन. सी. पाटील, डॉ. शांताराम पाटील, जितेंद्र मराठे, महिला जिल्हाध्यक्षा उषा पाटील, लीला बेडसे, हेमा पाटील ललित वारुडे, हेमा पाटील, कुसुम निकम, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या