Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमहॉंगकॉंगच्या कंपनीची 3 कोटीत फसवणूक

हॉंगकॉंगच्या कंपनीची 3 कोटीत फसवणूक

धुळ्यातील 9 जणांवर गुन्हा

धुळे (प्रतिनिधी)-: शहरातील अवधान एमआयडीसीतील सनलिंक फोटो व्होल्टीक कंपनी व पुण्यातील तेजस इंपेक्सचे मालक रामप्रसाद अग्रवाल व संचालकांनी सनशाईन इंटरनॅशनल प्रा.लि. हाँगकाँग या कंपनीची तब्बल तीन कोटीत आर्थिक फसवणुक केली. यासाठी त्यांनी माल खराब निघाल्याचा बनाव केला. याप्रकरणी रामप्रसाद अग्रवाल यांच्यासह 9 जणांवर मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु करण्यात आला आहे.

याबाबत मध्यप्रदेशातील इंदूर येथील सनशाईन कंपनीचे प्रतिनिधी मनिष गोविंद शर्मा यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, हाँगकाँग येथील सनशाईन इंटरनॅशनल प्रा.लि. ही कमिशन बेसीसवर वित्त पुरवठा करणारी कंपनी आहे. दरम्यान धुळे येथील सनलिंक फोटो व्होल्टीक प्रा.लि. (एमआयडीसी अवधान) व तेजस इंपेक्सचे (पुणे) मालक रामप्रसाद नारायण अग्रवाल व संचालक यांनी त्यांचे कंपनीत सोलरचे प्रोडक्ट बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्चा माल खरेदी करण्यासाठी 3 लाख 66 हजार 852 रुपये अमेरिकन डॉलरची (भारतीय चलनात 3 कोटी 12 लाख 4 हजार 431 रुपये) आवश्यकता होती. त्यामुळे सनशाईन कंपनीकडून रामप्रसाद अग्रवाल व संचालक मंडळाशी संपर्क करुन फायनान्स पुरविण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार सनशाईन इंटरनॅशनल प्रा.लि. ने रामप्रसाद नारायण अग्रवाल व संचालक यांनी दक्षिण कोरिया स्थित हानवा टोटल्स कंपनीकडून सोलर प्रोडक्टसाठी लागणारा कच्चा माल खरेदी करण्यासाठी सन 2021 मध्ये 3 लाख 66 हजार 852 अमेरिकन डॉलर (3 कोटी 12 लाख 4 हजार 431 रुपये) फायनान्स केला होता. त्यामुळे फायनान्सची ही रक्कम सनलिंक या कंपनीला देणे बंधनकारक होते. असे असतांना वरील संशयीत आरोपींनी विकत घेतलेला कच्चा माल खराच निघाला, असा बनाव केला. या मालाशी सनशाईन फायनान्स कंपनीचा काहीही संबंध नसतांना सनशाईन इंटरनॉशन प्रा लि कंपनीची 3 लाख 66 हजार 852 अमेरिकन डॉलरची (3 कोटी 12 लाख 4 हजार 419 रुपये) फसवणुक केली. हा प्रकार अवधान एमआयडीसीतील सनलिंक फोटोव्होल्टीक प्रा.लि. येथे मार्च ते ऑक्टोबर 2021 दरम्यान घडला. याप्रकरणी सनलिंक कंपनीचे मालक रामप्रसाद नारायण अग्रवाल व संचालक हनुमानप्रसाद नारायण अग्रवाल, राकोश सुभाष अग्रवाल, स्नेहा रामप्रसाद अग्रवाल, पवन सुभाष अग्रवाल, नारायण बसतीलाल अग्रवाल, मनिषा राकेश अग्रवाल, पुष्पा पवन अग्रवाल, शिलाबाई नारायण अग्रवाल सर्व (रा.धुळे) या नऊ जणांवर भारतीय दंड संहिता कलम 409,406,420,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव, पोसई अमोल देवढे, पोसई सुनिल कासले, पोहेकॉ रविंद्र माळी, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, गणेश खैरनार, विलास पाटील हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...