Thursday, September 19, 2024
Homeधुळे३०० टन भंगार मालासाठी आले अन लुटले गेले

३०० टन भंगार मालासाठी आले अन लुटले गेले

सुरतच्या तिघा व्यापार्‍यांना जंगलात नेत मारहाण, जामद्यातील १४ जणांवर गुन्हा, दोन अटकेत

धुळे | प्रतिनिधी- साक्री तालुक्यातील जामदा हे लुटमारीचे केंद्र झाले असून येथे नेहमीच वेगवेगळ्या आमिषाने व्यापार्‍यांना बोलावून लुटण्यात येत. त्याचप्रमाणे ३०० टन भंगार मालासाठी आलेले सुरतचे तिघ व्यापारी लुटले गेले आहेत. त्यांना जंगलात नेत हात-पाय बांधून मारहाण करण्यात आली. त्यांच्याकडील रोकड व सोने असा साडेतीन लाखांचा मुद्देमाल लुटण्यात आला. याप्रकरणी निजामपूर पोलिसात जामद्यातील १४ जणांवर गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

- Advertisement -

फोन  आला, माल पाहण्याचे ठरले- गुजरात राज्यातील सुरत, बरेली येथील व्यापारी पुतिनकुमार शर्मा (वय ३०) यांना जामदा येथून एकाने त्यांच्या मोबाईलवर फोन करीत तुम्ही भंगारचा व्यवसाय करतात का, अशी विचारणा केली. माझ्याकडे ३०० टन भंगार असल्याचे सांगितले. त्यानंतर शर्मा यांनी भंगारचा व्यापार करणारा मित्र मोहम्मद तारीफअली व कुलदिप यास याबाबत सांगितले. त्यावर तारीफअली याने जामदा गावी जावून माल पाहुन घेवू, मग सौदा पक्का करू असे सांगितले.  त्यानंतर फोन करणार्‍या व्यक्तीने भंगार मालाचा रेट ३१ रूपये सांगत त्याचे जामदा येथील गोडावूनचे लोकशन पाठविले.

जंगलात नेले अन लुटले- रेट ठरल्यानंतर पुनितकुमार शर्मा हे दोघा मित्रासंह त्यांच्या कारने दि. १२ रोजी दुपारी जामदा येथे पोहोचले. त्यानंतर तीन दुचाकींवर आलेल्या इसमांनी तिघांना जंगलात नेले. तेथे दोरीने बांधून ठेवत बेल्ट, लाठ्या-काठ्या, हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी शर्माकडील दीड लाखांची रोकड, ६० हजारांची दीड तोळ्यांची सोन्याची चैन, २५ हजारांचा लॅपटॉप, तीन हजाराचा मोबाईल, कुलदिपच्या गुगल पेवरून अडीच हजार, तारीफकडील ३५ हजारांची रोकड, १३ हजार रोख, एटीएम घेवून २ हजार असे एकुण ३ लाख ५३ हजार ६५५ रूपयांचा मुद्देमाल लुटून नेला. त्यानंतर तिघांना सोडून दिले.

निजामपूर पोलिसांनी सांगितली आपबिती, दोघांना अटक- घटनेनंतर तिघा व्यापार्‍यांनी निजामपूर पोलिस ठाणे गाठत आपबिती सांगितले. त्यानुसार पोलिसांनी रोहीत अमिर चव्हाण व भुरा निला भोसले यांना ताब्यात घेतले. तिघांना या दोघांना ओळखले. तसेच त्या दोघांनी त्यांच्या साथीदारांची देखील नावे पोलिसांना सांगितली. याप्रकरणी पुतिनकुमार शर्मा यांच्या फिर्यादीवरून वरील दोघांसह प्रभु अरविंद पवार, पनन तारांचंद पवार, आनंद तारांचद पवार, परबत रविन पवार,पंकेश रोशन चव्हाण, इक्बाल चव्हाण, मुकेश यंन्की पवार, सिध्दु भोसले , जॉनी संतोष भोसले, नितीन उर्फ गांगुली गंभीर चव्हाण,  नवेश चित्त भोसले,  सुनिल भामसिंग पवार सर्व  (रा. जामदा, ता. साक्री) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 

- Advertisment -

ताज्या बातम्या