Thursday, June 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमहसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर

नाशिक | जिमाका वृत्तसेवा

- Advertisement -

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवार 4 एप्रिल 2026 रोजी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते महाराजस्व अभियानास उपस्थित असून महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासोबतच विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपुत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

मंत्री बावनकुळे हे दुपारी १२ वाजता आडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित महसूल विभागाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास’ उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते शासनाच्या विविध योजना, दाखले नागरिकांना वितरीत केले जाणाार आहेत. दुपारी 1.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील महसूल, नोंदणी व मुद्रांक तसेच भुमी अभिलेख विभागातील अधिकारी यांच्या समवेत बैठक घेणार आहेत.

या दौऱ्यामुळे स्थानिक पातळीवरील विकासकामांना चालना मिळण्यासोबतच प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजपुत यांनी कळविले आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात एटीएसची छापेमारी; चौघांची चौकशी

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur शहरात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दाखल होत कारवाई केली, शहराच्या विविध भागांतील सात ते आठ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. सोशल मीडियाच्या...