Monday, October 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक जिल्ह्यातील 'उधमाळ' ठरणार पहिले आंतरराष्ट्रीय 'डार्क स्काय समुदाय' गाव

नाशिक जिल्ह्यातील ‘उधमाळ’ ठरणार पहिले आंतरराष्ट्रीय ‘डार्क स्काय समुदाय’ गाव

नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील उधमाळ गाव हे डार्कस्काय इंटरनॅशनल (DarkSky International) या संस्थेकडून प्रमाणित होणारे भारतातील पहिले ‘डार्क स्काय समुदाय’ (Dark Sky Community) गाव ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या उपक्रमास आवश्यक निधीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्र आणि अवकाश संशोधनाविषयी आवड निर्माण करणे तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती विकसित करण्याच्या मूलभूत कर्तव्याच्या अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उधमाळचे नैसर्गिकरीत्या स्वच्छ आणि अंधारमय आकाश विद्यार्थ्यांना अवकाश निरीक्षणासाठी उपयुक्त ठरणार आहे.

उधमाळ ग्रामसभेने पेसा (PESA) कायद्यांतर्गत अंधारमय आकाशाचे संवर्धन आणि जबाबदार बाह्य प्रकाशयोजनांना प्रोत्साहन देणारा ठराव मंजूर केला आहे. या ठरावाद्वारे प्रकाश प्रदूषण कमी करण्यासाठी सुरक्षित, ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक प्रकाशयोजनांचा अवलंब करण्यावर भर देण्यात आला आहे.

या उपक्रमासाठी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना २०२६-२७ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेमधून रु. ४२.१४ लाख निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून रात्रीच्या आकाशाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन, जबाबदार प्रकाशयोजना, जनजागृती कार्यक्रम तसेच स्थानिक युवकांचे प्रशिक्षण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

जिल्हा नियोजन समितीमार्फत पर्यटन विकासाला चालना देण्याच्या प्रयत्नांमध्ये खगोल पर्यटन (अ‍ॅस्ट्रो-टुरिझम) ही संकल्पना महत्त्वाची ठरणार असून, या उपक्रमामुळे उधमाळ व परिसरातील नागरिकांना नैसर्गिक वारसा जपत शाश्वत उपजीविकेच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

राज्य शासनाच्या प्रस्तावित ‘राज्य डार्क स्काय धोरणा’शी हा उपक्रम सुसंगत असून, रात्रीच्या आकाश संवर्धनाच्या क्षेत्रात नाशिक जिल्हा राज्यात अग्रणी भूमिका बजावेल, असा विश्वास आहे. – आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक

ताज्या बातम्या

संपादकीय : १९ ऑक्टोबर २०२६ – डिजिटल व्यवहारांचे अर्थकारण आणि विश्वास

0
Daily Deshdoot Editorial 19 October 2026 भारताच्या डिजिटल क्रांतीने आर्थिक व्यवहारांचे चित्र आमूलाग्र बदलले आहे. चहाच्या टपरीपासून मोठ्या मॉलपर्यंत आणि भाजीविक्रेत्यापासून नामांकित व्यापार्‍यापर्यंत सर्वत्र यूपीआय...