Thursday, June 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : पंचवटीतील श्री काळाराम मंदिरावर उद्या धर्मध्वजारोहण

Nashik News : पंचवटीतील श्री काळाराम मंदिरावर उद्या धर्मध्वजारोहण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद राहणार उपस्थित

पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिकचे श्रद्धास्थान असलेल्या काळाराम मंदिरात अयोध्येच्या धर्तीवर २१ फूट उंच भव्य पितळी ध्वजदंड उभारण्यात आला आहे. या ध्वजदंडावर ध्वजारोहण सोहळा आणि यज्ञ पूजा बुधवार, (दि. ६) रोजी संध्याकाळी संपन्न होणार आहे.

- Advertisement -

या सोहळ्यासाठी देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अयोध्या न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आणि फिक्कीचे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे उपस्थित राहणार आहेत. तसेच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, दादासाहेब गायकवाड यांचे नातू यांच्यासह विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर, वरिष्ठ अधिकारी आणि साधू-महंत या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत.

उद्या संध्याकाळी ४ वाजून ४४ मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण पार पडेल. त्यानंतर यज्ञाची पूर्णाहुती देऊन कार्यक्रमाची सांगता होईल.

​ध्वजदंडाची वैशिष्ट्ये
धातू: हा ध्वजदंड पंचधातूपासून तयार करण्यात आला आहे.
उंची: ध्वजदंडाची एकूण उंची २१ फूट आहे.
ध्वजाचा आकार: ११ बाय ५ फुटांचा भगवा ध्वज यावर फडकणार आहे.
चिन्हांकन: या ध्वजावर हनुमंतरायाची प्रतिमा आणि सूर्यदेवाचे ‘ॐ’ चिन्हांकित करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दोन लाखांपर्यंत कर्जमुक्ती मिळणार्‍यांची संख्या घटणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महायुती सरकारने अखेर मंगळवारी (2 जून) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या योजनेचा अध्यादेश जारी करण्यात आल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात...