Thursday, August 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिकमध्ये भूकंपसदृश्य धक्के?

नाशिकमध्ये भूकंपसदृश्य धक्के?

नाशिक शहर व जिल्ह्याच्या काही भागात जाणवले कंपन

पंचवटी | नाशिक | सिडको | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिक शहराच्या अवतीभवती भूकंप सदृश्य धक्के जाणवण्याच्या घटना यापूर्वी घडल्या असताना शनिवारी (दि. ८) रात्री म्हसरूळ-आडगाव जत्रा हॉटेल परिसरात, नवीन नाशिक परिसरात भूकंपसदृश धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिल्याने एकच खळबळ उडाली. रात्री सुमारे १० वाजून ३ मिनिटांच्या सुमारास अचानक जमीन हादरल्यासारखी व कंपन जाणवल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

म्हसरूळ, आडगाव तसेच जत्रा हॉटेल परिसरातील काही नागरिकांना घरातील वस्तू व दरवाजे हलल्यासारखे जाणवले. काहींनी अचानक आलेल्या कंपनामुळे घराबाहेर येत परिसरात पाहणी केली. पंचवटी परिसरातही अशाच प्रकारचे धक्के जाणवले असल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे.

नाशिक शहराच्या परिसरात यापूर्वीही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शनिवारी रात्री जाणवलेल्या या कंपनांमुळे नागरिकांमध्ये अधिकच चिंता निर्माण झाली. नेमके हे धक्के भूकंपाचे होते की अन्य कोणत्या कारणामुळे कंपन निर्माण झाले, याबाबत अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाकडून अद्याप मिळाली झालेली नाही.

दरम्यान, या घटनेची अधिकृत भूकंपमापन यंत्रणेकडून नोंद झाली आहे का, तसेच धक्क्यांची तीव्रता किती होती, याबाबत प्रशासनाकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. अधिकृत अहवालानंतरच या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीती
रात्रीच्या वेळी अचानक जाणवलेल्या कंपनामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सिद्ध पिंपरी
आज रात्री दहा वाजून एक मिनिटापूर्वी सिद्ध पिंपरी आणि परिसरात भूकंपाचे सौम्य प्रमाणात झटके जाणव लागले असल्याने घरातील स्त्री पुरुष आपल्या घराबाहेर येऊन थांबले यामध्ये मोठ्या प्रमाणात आवाज होऊन त्या ठिकाणी कौलारू घरी पत्रे असे पूर्णपणे हादरून हालचाल झाली असल्याने या भागात भीतीचे वातावरण तयार झाले आहे आज पर्यंत कधी नाही असा भूकंपाचा धक्का सिद्ध पिंपरीत जाणवू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे एकंदरीत हा भूकंप रात्री झाल्या असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

आम्ही रात्री टीव्ही पाहत असतानाच आमचा दोन मजली असलेला बंगला मोठ्या प्रमाणात हादरला असल्याने एक प्रकारे भूकंपाचा धक्का जाणू लागल्याने संपूर्ण कुटुंब आम्ही घराबाहेर येऊन याचा अनुभव घेतला खरोखर हा सौम्य भूकंपाचा धक्का की वेगळा काही प्रकार काय हा आजूबाजूच्या परिसरात चर्चेचा विषय ठरवून सौम्य प्रकारचा भूकंपाचा धक्का असल्याचे नागरिकांनी आपले मत मांडले
शवंतराव ढिकले माजी जि प सदस्य

दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी महाजे तळेगाव गोळशी ननाशी गोळशी आदी परिसर भूकंप आणि आधारला दहा वाजून एक मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. अचानक घर हादरल्याने ग्रामस्थ सुद्धा भयभीत झाले. अनेक लोक घराबाहेर पळाले. आदिवासी भागातील गवळा पाडा महाजे वारे परिसरात भूकंपाचे जास्त तीव्रता वाढली. त्यामुळे लोकांनी एकमेकाला मोबाईल वरून माहिती घेऊन सावध केले. दिंडोरी शहरातील परिसरात धामण नदी तिरा लगत भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हेमंत बोरसे यांनी दिली वारे परिसरात भूकंप हादरा जोरात जाणवल्याचे माजी आमदार धनराज महाले यांनी सांगितले. गवळीवाडा येथे लोक घराबाहेर राहण्याची माहिती गणेश गवळी यांनी दिली विठ्ठल नगर येथे घराचे झाड थरथरल्याचे नरेश चव्हाण यांनी सांगितले दिंडोरी परिसरात यंदाचा हादरा सर्वांनाच जाणवला. दिंडोरी तालुक्यात वारंवार भूकंपाचे धक्के बसू लागल्याने शासनाने गाफील न राहता तातडीने उपाययोजना करावी लोकांना सावध करावे भूकंपमापक यंत्रणा बसवावी अशी मागणी धनराज महाले यांनी केली आहे.

जिल्हा प्रशासानाचे नागरिकांना आवाहन

🏠 घरात असल्यास खिडक्या, काचा, कपाटे व जड वस्तूंपासून दूर राहावे. शक्य असल्यास मजबूत टेबलाखाली आसरा घ्यावा.

🚫 भूकंपाचे धक्के सुरू असताना लिफ्टचा वापर करू नये व धावत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नये.

🌳 धक्के थांबल्यानंतर इमारतीपासून सुरक्षित अंतरावर मोकळ्या जागेत जावे. विजेच्या तारा, झाडे व धोकादायक बांधकामांपासून दूर राहावे.

📱 अफवा किंवा अप्रमाणित माहिती पसरवू नये. प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.

👨‍👩‍👧‍👦 विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींची काळजी घ्यावी.

सतर्क राहा • सुरक्षित राहा • अफवांवर विश्वास ठेवू नका

🙏 सर्व नागरिकांनी शांतता राखून एकमेकांना सहकार्य करावे.

ताज्या बातम्या

Shirdi : अमेरिकेतील युद्धाच्या धोरणामुळेच डांबराची टंचाई

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धधोरणामुळे आणि पश्चिम आशियातील तणावामुळे डांबराची टंचाई निर्माण होऊन नगर-मनमाड महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या आपल्या...