Tuesday, August 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआदिवासी दिनानिमित्त नाशिकमध्ये भव्य मिरवणूक; पारंपरिक संस्कृतीचे दर्शन

आदिवासी दिनानिमित्त नाशिकमध्ये भव्य मिरवणूक; पारंपरिक संस्कृतीचे दर्शन

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी : Nashik

जागतिक आदिवासी दिनानिमित्त शहरात आदिवासी समाजाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली. पंचवटी येथून सुरू झालेली ही मिरवणूक गोल्फ क्लब मैदानापर्यंत काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्ये आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांमुळे शहरातील वातावरण आदिवासी संस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघाले.

मिरवणुकीच्या अग्रभागी आदिवासी समाजाचे पारंपरिक ध्वज व फलक घेऊन युवक सहभागी झाले होते. महिला, पुरुष तसेच बालकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभाग नोंदविला. विविध आदिवासी जमातींच्या परंपरा, लोककला, संस्कृती आणि जीवनशैलीचे दर्शन घडविणारे देखावे मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले.

मिरवणुकीदरम्यान आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच नव्या पिढीला आपल्या परंपरांची ओळख करून देण्याचा संदेशही मिरवणुकीतून देण्यात आला. मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत असतांना रेडक्रॉस सिग्नल येथे आमदार देवयानी फरांदे, माजी महापौर विनायक पांडे, नगरसेविका स्वाती भामरे यांनी मिरवणुकीचे स्वागत केले. मार्गावर नागरिकांनीही मिरवणुकीचे स्वागत केले. ढोल, ताशे आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर युवकांनी ठेका धरला तर महिलांनी पारंपरिक नृत्य सादर केले. त्यामुळे मिरवणुकीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गोल्फ क्लब येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. यावेळी आदिवासी समाजाच्या एकजुटीचा आणि सांस्कृतिक अस्मितेचा जागर करण्यात आला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी, शिंगणापूरमध्ये पार्किंगची पर्यायी व्यवस्था

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नाशिक कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधांची कामे जलदगतीने पूर्ण...