Friday, July 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजचार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

राज्य सरकारने मंगळवारी चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार योगेश म्हसे-पाटील यांच्या सेवानिवृत्तीने रिक्त झालेल्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवपदी डॉ. माधवी खोडे-चावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सुनील महिंद्रकर यांची अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक म्हणून नेमणूक झाली आहे.

अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने यांची बदली जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी झाली आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २४ जुलै २०२६ – युवकांचा आक्रोश अन् राजकारणाचा बनाव

0
वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षा पेपरफुटीचे पडसाद निकाल किंवा न्यायालयाच्या कक्षांपुरते मर्यादित न राहता, थेट देशातील रस्त्यारस्त्यांवर उमटले आहेत. लाखो तरुणांचे भविष्य अंधारात ढकलले गेल्याच्या...