Sunday, May 19, 2024
Homeजळगावसॉफ्टवेअर एक्सपोर्ट व्यवसायिकाला 1 कोटीचा ऑनलाईन गंडा

सॉफ्टवेअर एक्सपोर्ट व्यवसायिकाला 1 कोटीचा ऑनलाईन गंडा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील ओंकारनगरातील (Omkarnagar) सॉफ्टवेअर एक्सपोर्ट कंपनीच्या (Software Export Company) मालकाला (owner) शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग (Trading share market) करून अधिक फायद्याचे आमिष देत तब्बल 1 कोटी 44 लाख 26 हजार 116 रुपयांची फसवणुक (Fraud) केल्याची खळबळ प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) तीन जणांवर गुन्हाची नोंद वनिरा हायटेक सॉफटवेअर एक्सपोर्ट कंपनीचे (Vanira Hitech Software Export Company) मालक वासुदेव रामदास महाजन यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली आहे.

- Advertisement -

ओंकारनगरातील रहिवासी वासुदेव महाजन यांची वनिरा हायटेक सॉफ्टवेअर एक्सपोर्ट कंपनी आहे. ऑक्टोंबर महिन्यात त्यांनी गुगलवर ग्रॉथ ट्रेड इंडिया डॉट कॉम ही वेबसाईड सर्च केली. ही कंपनी शेअर बाजारात गुतंवणूक करण्या संदर्भात सेवा पुरविते असल्याने महाजन यांनी त्यांची संपूर्ण माहिती भरली होती. त्यानंतर कंपनीकडून आयेशा नामक महिलेचा महाजन यांना फोन येत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात सल्ला दिला होता.

६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा :
जळगाव केंद्रातून समर्थ बहुउद्देशीय संस्थेचे ‘अर्यमा उवाच’ प्रथम

महाजन यांनी किरकोळ व्यवहार केल्यांतर त्यांना यात नफा मिळाला पून्हा कंपनीकडून आयशा महिलेचा फोन येत पाच हजार रुपये भरून शेअर मार्केट गुतंवणूक तज्ञाशी बोलून पाच हजार रुपये भरले. नंतर वेळोवेळी तब्बल 1 कोटी 44 लाख 26 हजार 116 रुपये महाजन यांनी दिली. मात्र दिलेल्या वेळेत नफा न मिळाल्याने महाजन यांना आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी गुरूवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जावून आयशा (पुर्ण नाव माहित नाही), विष्णु अग्रवाल, रिचा गुप्ता, अंगदसींग ऊर्फ अरुण (पुर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हा दूध संघासाठी आज मतदानVisual Story : ड्रिम गर्लने दिल्या तीच्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

व्यवसायिक आमिषाला पडले बळी

वासुदेव महाजन यांना ग्रॉथ ट्रेड इंडियाचा 3 नोव्हेंबर रोजी मेल आला होता. यात साडेसात लाख रूपये गुंतवणूक केल्यास 25 ते 30 दिवसात 60 लाख रूपयांचा नफा सोबत गुंतवणूकीची रक्कम परत मिळेल. कंपनी फक्त काही टक्के रक्कम घेईल असे नमूद केले होते. 31 ऑक्टोंबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत वेळोवेळी अधिक नफ्याचे आमिष कंपनीने दाखवले आणि महाजन यांनी 1 कोटी 44 लाख 26 हजार 116 रूपयांची रक्कम ही रक्कम त्यांनी ऑनलाईन भरली. 25 नोव्हेंबरला नफ्याची 7 कोटी 68 लाख 79 हजार 518 रक्कम आणि गुंतवणूक केलेली रक्कम ही 28 नोव्हेंबरला मिळेल असा ग्रॉथ ट्रेड इंडिया मेल आला. पण पैसे न मिळाल्याने पुन्हा महाजन यांनी संपर्क केला. रक्कम 5 डिसेंबरपर्यंत मिळेल असे सांगितले गेले मात्र 5 डिसेंबरला ही गुंतवणूक व आणि नफ्याची एकूण 9 कोटी 13 लाख 5 हजार रूपयांची रक्कम जमा झाली नाही म्हणून महाजन यांना शंका निर्माण झाली.

VISUAL Story: अभिनेत्री मृणाल ठाकूरचा बॉसी अवतार पाहाल तर प्रेमातच पडाल !

कंपनीच्या पत्त्यावर केली चौकशी

फसवणूक होत असल्याचे लक्षात येत असल्याने महाजन यांनी वेबसाईडवर ग्रॉथ ट्रेड इंडिया सर्च केली. त्यावर कोलकत्ता आणि नाशिक येथील कंपनीचा पत्ता होता. या पत्त्यावर त्यांनी कंपनी बाबत चौकशी केली असता या दोन्ही ठिकाणी ग्रॉथ ट्रेड इंडिया नामक कुठली कंपनी नसल्याचे माहिती समोर आली. आणि महाजन यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या